Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२७
१३१ गतिं खर इवाश्वस्य हंसस्येव च वायसः।
नान्वेतुमुत्सहे वीर तव मार्गमरिंदम ॥ ६।१२८१५ (भरत रामाला म्हणतो. ) हे शत्रुदमना वीरा, ज्याप्रमाणे घोड्याच्या गतीचे अनुकरण करण्यास गर्दभ असमर्थ आहे, अथवा हंसाची गति स्वीकारण्यास कावळा असमर्थ आहे. त्याप्रमाणे प्रजेचें रक्षण करण्याच्या तुझ्या मार्गाचे अवलंबन करण्यास मीअसमर्थ आहे.. १३२ गतिरेका पतिर्नार्या द्वितीया गतिरात्मजः।
तृतीया ज्ञातयो राजश्चतुर्थी नैव विद्यते ॥ २६१।२४ (कौसल्या दशरथाला म्हणते ) हे राजा, स्त्रियांना पहिली गति म्हणजे पति ही होय. त्यांची दुसरी गति म्हणजे पुत्र, आणि तिसरी.. गति म्हटली म्हणजे ज्ञाति होत. त्यांना चवथी गति (आधार) म्हणून नाही. १३३ गतोदके सेतुबन्धो न कल्याणि विधीयते ॥ २।९।५४
(मंथरा कैकेयीला म्हणते) हे कल्याणि, पाणी निघून गेल्यावर कोणी बांध घालीत नसतात. १३४ गर्जन्ति न वृथा शूरा निर्जला इव तोयदाः ॥६६५।३
शूर लोक, निर्जल मेघांप्रमाणे, व्यर्थ गर्जना करीत नसतात. १३५ गात्रेषु वलयः प्राप्ताः श्वेताश्चैव शिरोरुहाः ।
जरया पुरुषो जीर्णः किं हि कृत्वा प्रभावयेत् २।१०५।२३ (राम भरताला सांगतो) अवयवांवर सुरकुत्या पडतात, मस्तकावरील केस पांढरे होऊन जातात आणि जरेनें मनुष्य जीर्ण होऊन जातो. तेव्हां कोणता उपाय करून हे सर्व टाळण्याला प्राणी समर्थ होणार आहे ?
For Private And Personal Use Only