Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
३२
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
१५३ तडित्पताकाभिरलंकृताना
मुदीर्णगम्भीरमहारवाणाम् । विभान्ति रूपाणि बलाहकानां
रणोत्सुकानामिव वानराणाम् ॥ ४।२८।३१ (वर्षाकालाचे वर्णन ) ज्यांच्याकडून गंभीर आणि मोठा शब्द उच्चारला जात आहे, अशी ही विद्युल्लतारूप पताकांनी शोभणारी मेघांची रूपें युद्धार्थ उत्सुक झालेल्या वानरांसारखीं शोभत आहेत. १५४ ततः सुमन्त्रेण गुहेन चैव
समीयतू राजसुतावरण्ये । दिवाकरश्चैव निशाकरश्च
यथाम्बरे शुक्रबृहस्पतिभ्याम् ॥ २।९९।४१ (भरत शत्रुघ्न वनामध्ये असलेल्या रामाला भेटले ) नंतर सूर्य आणि चंद्र हे जसे आकाशांत शुक्र आणि बृहस्पति यांच्याशी संयुक्त होतात (भेटतात ), त्याप्रमाणे ते राजपुत्र-रामलक्ष्मण-अरण्यांत. सुमंत्र (प्रधान) आणि गुह यांना भेटले. १५५ तदद्भुतं स्थैर्यमेवक्ष्य राघवे
समं जनो हर्षमवाप दुःखितः। न यात्ययोध्यामिति दुःखितोऽभवत्
स्थिरप्रतिज्ञत्वमवेक्ष्य हर्षितः॥२।१०६।३४ रामाच्या आंगचे (पितृवचनपालनरूप ) अद्भुतं स्थैर्य पाहून लोकांना दुःख झाले, तसाच हर्षही झाला. रामचंद्र अयोध्येला येत नाही, म्हणून दुःख झाले, त्याप्रमाणे त्याच्या प्रतिक्षेची स्थिरता पाहून त्यांना हर्ष झाला.
For Private And Personal Use Only