Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
१४९ जीवन्त्या हि स्त्रिया भर्ता दैवतं प्रभुरेव च ॥२।२४।२१
स्त्री जिवंत असतांना पति हेच तिचे दैवत आहे, त्याचप्रमाणे तो तिचा प्रभुही आहे. १५० जीवैच्चिरं वज्रधरस्य पश्चा
च्छची प्रधृष्याप्रतिरूपरूपाम् । न मादृशी राक्षस धर्षयित्वा
पीतामृतस्यापि तवास्ति मोक्षः ॥ ३४८२४ (सीता रावणाला म्हणते ) हे राक्षसा, वज्र धारण करणाऱ्या इंद्राची जी अनुपम सौंदर्यसंपन्न भार्या शची तिचा अपहार केल्यानंतरही कदाचित् पुष्कळ दिवसपर्यंत जिवंत राहणे शक्य आहे; परंतु बलात्काराने मजसारख्या रामभार्येला हरण करून नेल्यावर तूं जरी अमृतपान केलेस तरी मृत्यूपासून तुझी सुटका होणार नाही. १५१ जेतव्यमिति काकुत्स्थो मर्तव्यमिति रावणः ।
धृतौ स्ववीर्यसर्वस्वं युद्धेऽदर्शयतां तदा ॥६।१०७७ रामाने जिंकण्याचा व रावणाने मरण्याचा निश्चय करून आपले सर्व काही सामर्थ्य त्या वेळी युद्धामध्ये प्रगट केले. १५२ ज्येष्ठो भ्राता पिता वापि यश्च विद्यां प्रयच्छति ।
त्रयस्ते पितरो ज्ञेया धर्मे च पथि वर्तिनः ॥४।१८।१३ (राम वालीला म्हणतो) वडील बंधु, पिता आणि जो विद्या शिकवितो तो हे तिघेजण, धर्ममार्गाने चालणान्याचे पिते आहेत असे समजले पाहिजे.
For Private And Personal Use Only