Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
.wwwwwwwwwwwwwwwwwwwwwww
१४४ चतुर्णामाश्रमाणां हि गार्हस्थ्यं श्रेष्ठमुत्तमम् २।१०६।२२
चारही आश्रमांमध्ये गृहस्थाश्रम हाच उत्तम होय. १४५ चन्द्रहीनमिवाकाशं तोयहीनमिवार्णवम् । __अपश्यनिहतानन्दं नगरं ते विचेतसः॥ २।४७११८
(रामाच्या पाठोपाठ गेलेले लोक खिन्न होऊन परत अयोध्येमध्ये आले त्या वेळी ) चंद्रहीन आकाशाप्रमाणे अथवा उदकशून्य सागराप्रमाणे आनंदरहित झालेले नगर त्या भांबावून गेलेल्या लोकांनी अवलोकन केले. १४६ चारेण विदितः शत्रुः पण्डितैर्वसुधाधिपः ।
युद्धे स्वल्पेन यत्नेन समासाद्य निरस्यते ॥ ६२९।२२ शहाण्या राजांनी हेरांकडून ज्याची माहिती मिळविली आहे 'असा शत्रु युद्धभूमीवर प्राप्त झाला असतां, अल्प प्रयत्नाने नाश पावतो. १४७ छिन्ना भिन्ना प्रभिन्ना वा दीप्ता वानौ प्रदीपिता।
रावणं नोपतिष्ठेयं किं प्रलापेन वश्चिरम् ॥ ५।२६।१० (सीता राक्षसस्त्रियांना म्हणते) तुमच्या या पुष्कळ बडबडीचा 'उपयोग काय ? मी छिन्नभिन्न झाले असतां, माझे तुकडे तुकडे झाले असतां, मी अग्नीने भाजून गेले असतां, अथवा पेटलें असतांही रावणाचा स्वीकार करणार नाही. १४८ जानामि शीलं ज्ञातीनां सर्वलोकेषु राक्षस ।
हृष्यन्ति व्यसनेष्वेते ज्ञातीनां ज्ञातयः सदा ॥६।१६।३ ( रावण बिभीषणाला म्हणतो ) हे राक्षसा, त्रैलोक्यामध्ये भाऊबंदांचा स्वभाव कसा असतो, हे मी जाणीत आहे. अरे, भाऊबंदांवर संकटे आली असतां दुसरे भाऊबंद नेहमी आनंद मानीत असतात.
"दृष्यन्ति व्यसनम
) हे राक्षसा
आहे. अरे,
For Private And Personal Use Only