Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२८ सार्थश्रीरामायणसुभाषितानि १३६ गायन्ति केचित्प्रहसन्ति केचित्
नृत्यन्ति केचित्प्रणमन्ति केचित् । पठन्ति केचित्प्रचरन्ति केचित्
प्लवन्ति केचित्प्रलपन्ति केचित् ।। ५।६१।१७ (सीतेचा शोध लागल्यामुळे आनंदित झालेले वानर मधुपान करून तर झाले) कित्येक (वानर ) गाऊ लागले, कित्येक हसू लागले, कित्येक नाचूं लागले, कित्येक प्रणाम करू लागले, कित्येक पठण करू लागले, कित्येक संचार करूं लागले, कित्येक उड्या मारू लागले, तर कित्येक बडबड करूं लागले. १३७ गुणवान्वा परजनः स्वजनो निर्गुणोऽपि वा।
निर्गुणः स्वजनःश्रेयान् यः परः पर एव सः॥६।८७१५ ( इंद्रजित् बिभीषणाला म्हणतो) स्वजन निर्गुण असून दुसरे जरी गुणी असले तरी निर्गुणी स्वजन बरे, परंतु जे परके ते 'परकेच होत. १३८ गुरुलाघवमर्थानामारम्भे कर्मणां फलम् ।
दोषं वा यो न जानाति स बाल इति होच्यते ॥२।६३७ कोणत्याही कर्माला आरंभ करण्याच्या वेळी त्याच्या फलासंबंधाने उत्कृष्टनिकृष्टभाव आणि गुणदोष जो जाणीत नाही त्याला मूर्ख असे म्हणतात. १३९ गुरोरप्यवलिप्तस्य कार्याकार्यमजानतः । ... उत्पथं प्रतिपन्नस्य कार्य भवति शासनम् ॥ २॥२१॥१३
कार्याकार्यविचार न जाणणारा, दुर्मार्गाला लागलेला, व गर्विष्ठ, अशा गुरूसही दंड करणे योग्य होय.
For Private And Personal Use Only