Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
३४
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
१६१ तीक्ष्णमल्पप्रदातारं प्रमत्तं गर्वितं शठम् ।
व्यसने सर्वभूतानि नाभिधावन्ति पार्थिवम्।।३।३३।१५ जो ( आपल्या प्रधानादिकांशी) कठोरपणाने वागतो, त्यांस वेतन वगैरे स्वल्प प्रमाणाने देतो, जो उन्मत्तपणे वागतो, गर्व धारण करितो, गुप्तपणे लोकांचे अहित करितो, अशा राजावर संकट आले असतां, त्याच्या संरक्षणाकरितां कोणीही त्याचे स्वजनहीं-धावून येत नाहीत. १६२ त्वद्विधा न हि शोचन्ति सततं सर्वदर्शनाः ।
सुमहत्स्वपि कृच्छेषु रामानिर्विण्णदर्शनाः ॥३॥६६।१४ (लक्ष्मण म्हणतो ) हे रामा, तुझ्यासारखे सर्वज्ञानसंपन्न लोक, केवढीही मोठी संकटे आली, तरी विषादरहित असतात. कधीही शोक करीत नाहीत. १६३ त्वं तु बालस्वभावश्च बुद्धिहीनश्च राक्षस ।
ज्ञातव्यं तं न जानीषे कथं राजा भविष्यसि ॥ ३॥३३॥८ (शूर्पणखा रावणाला म्हणते.) हे राक्षसा, तुझा बालस्वभाव अजून गेला नाही. तूं बुद्धिहीन आहेस. जे जाणण्यास योग्य तें तूं जाणत नाहीस. तूं राजा कसा होणार ? १६४ त्वं पुनर्जम्बुकः सिंहीं मामिहेच्छसि दुर्लभाम् ।
नाहं शक्या त्वया स्प्रष्टमादित्यस्य प्रभा यथा ३।४७।३७ (सीता रावणाला म्हणते ) हूं तर कोल्हा असून दुर्लभ अशा सिंहपत्नीची-माझी-इच्छा करीत आहेस; सूर्यापासून सूर्यप्रभा वेगळी करून स्पर्श करणे जसे शक्य नाही, त्याप्रमाणे तूं मला स्पर्श करणे ही गोष्ट शक्य नाही.
For Private And Personal Use Only