Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२२
सार्थ श्रीरामायणसुभाषितानि
१०४ कर्तव्यं वास्तुशमनं सौमित्रे चिरजीविभिः ॥ २/५६।२२ ( राम म्हणतो ) हे लक्ष्मणा, चिरकाल जीविताची इच्छा करणाऱ्यांनी वास्तुशांति करावी.
१०५ कर्म लोकविरुद्धं तु कुर्वाणं क्षणदाचर ।
तीक्ष्णं सर्वजनो हन्ति सर्प दुष्टमिवागतम् || ३ |२९|४
( राम खर राक्षसाला म्हणतो ) हे राक्षसा, प्राप्त झालेल्या दुष्ट सर्पाचा सर्व लोक वध करितात. त्याचप्रमाणें लोकविरुद्ध कर्म करणाऱ्या क्रूर पुरुषाचाही वध करितात.
१०६ कल्याणी बत गाथेयं लौकिकी प्रतिभाति
माम् । एति जीवन्तमानन्दो नरं वर्षशतादपि ।। ६ । १२६।२
( भरत मारुतीला म्हणतो) मनुष्य जिवंत राहिल्यास, शंभर वर्षांनीं कां होईना, त्याला आनंद प्राप्त होतो, ही लोकप्रसिद्ध म्हण कल्याणप्रद आहे, असें मला वाटतें.
१०७ कश्चिदाम्रवणं छित्त्वा पलाशांश्च निषिञ्चति ।
पुष्पं दृष्ट्वा फले गृध्नुः स शोचति फलागमे ॥ २/६३।८ः
जो कोणी आम्रवन तोडून पलाश वृक्षांचें सिंचन करितो, व त्या पळसांचें पुष्प पाहून फळही तसेंच मिळेल, अशी आशा करितो, तो फलप्राप्तिकालीं शोक पावतो.
१०८ कामं दृष्ट्वा मया सर्वा विश्वस्ता रावणस्त्रियः ।
न तु मे मनसा किंचिद्वैकृत्यमुपपद्यते ॥ ५।११।४२
( सीतेचा शोध लावण्यासाठी रावणाच्या अंतःपुरांत शिरलेला मारुति म्हणतो) परपुरुष आपणाला पाहील, अशी यत्किंचितही शंका ज्यांच्या मनांत नाहीं, अशा निःशंकपणें पडलेल्या सर्व रावणस्त्रिया मी पाहिल्या, परंतु या पाहण्यामुळे मनामध्यें कांहींच विकार उत्पन्न झाला नाहीं.
For Private And Personal Use Only