Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीरामायणसुभाषितानि
३८ अर्थी येनार्थकृत्येन संव्रजत्यविचारयन् । तमर्थमर्थशास्त्रज्ञाः प्राहुरर्थ्याः सुलक्ष्मण || ३ | ४३ | ३४
( राम म्हणतो ) हे भल्या लक्ष्मणा, कोणी पुरुष एखाद्या अर्थाची अपेक्षा करून त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करितो, तो, विचार न करितां केलेला असला, तरी अर्थशास्त्रज्ञ शहाणे लोक त्यास ' अर्थच ' म्हणत असतात.
३९ अर्थेन हि विमुक्तस्य पुरुषस्याल्पचेतसः ।
विच्छिद्यन्ते क्रियाः सर्वा ग्रीष्मे कुसरितो यथा ६।८३।३३
९
ग्रीष्म ऋतूंत ज्याप्रमाणें लहान लहान नद्या आटून जातात त्याप्रमाणें द्रव्यहीन आणि अल्पबुद्धि अशा मनुष्याच्या सर्व क्रिया
नाश पावतात.
४० अर्थेभ्योऽथ प्रवृद्धेभ्यः संवृत्तेभ्यस्ततस्ततः ।
क्रियाः सर्वाः प्रवर्तन्ते पर्वतेभ्य इवापगाः || ६ | ८३।३२ पर्वतापासून ज्याप्रमाणें नद्या उत्पन्न होत असतात, त्याप्रमाणे संपादन केलेल्या आणि सर्वत्र वृद्धिंगत झालेल्या द्रव्यापासून सर्व क्रिया सिद्ध होतात.
४१ अर्थो हि नष्टकार्यार्थैरयत्नेनाधिगम्यते ॥ ४।१।१२१
नष्ट झालेली वस्तू ज्यांना अवश्य मिळवावयाची आहे त्यांना ती यत्नावांचून कधीहि मिळत नाहीं.
४२ अवश्यं लभते कर्ता फलं पापस्य कर्मणः ।
घोरं प्रत्यागते काले द्रुमः पुष्पमिवार्तवम् ||३|२९|८
ज्याप्रमाणें वृक्षावर त्या त्या ऋतुकालाला उचित अशीं पुष्पें उत्पन्न होतात, त्याप्रमाणें पापकर्माचें दुःखरूप फल भोगकाल आला असतां कर्त्याला अवश्य भोगावें लागतें.
For Private And Personal Use Only