Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
३० अमृतं विषसंपृक्तं त्वया वानर भाषितम् ।
यच्च नान्यमना रामो यच्च शोकपरायणः ॥५॥३७।२ (सीता मारुतीला म्हणते ) हे वानरा, तुझें भाषण विषमिश्रित अमृतासारखे आहे. 'रामाचे मन (तुजवांचून) कोणत्याही ठिकाणी आसक्त होत नाही, हे जे तूं बोललास, तें अमृतासारखें, व 'राम ( तुझ्यासंबंधानें ) एकसारखा शोक करीत आहे' असें जें तूं सांगितलेंस, ते मला विषासारखे वाटत आहे. ३१ अयं हि सागरो भीमः सेतुकर्मदिदृक्षया ।
ददौ दण्डभयाद्गाधं राघवाय महोदधिः।।६।२२।४७ ( वानरश्रेष्ठ नल म्हणतो ) ह्या भयंकर महोदधि सागराने, दंडाच्या भीतीमुळे, सेतुकार्य पाहाण्याची इच्छा धरून राघवास (आपला ) ठाव दिला. ३२ अयुक्तचारं दुर्दर्शमस्वाधीनं नराधिपम् ।
वर्जयन्ति नरा दूरान्नदीपङ्कमिव द्विपाः ॥ ३॥३३॥५ जो राजा (राष्ट्रांतील बातम्या समजाव्या म्हणून ) हेरांची योजना करीत नाहीं; (प्रजाजनांस) दर्शन देत नाही. जो परतंत्र असतो, (स्त्रियादिकांच्या स्वाधीन असतो) त्याला नदीतील चिखल पाहतांच हत्ती नदीचा त्याग करून जातात, त्याप्रमाणे लोक वयं करितात. ३३ अरयश्च मनुष्येण विज्ञेयाश्छद्मचारिणः ।
विश्वस्तानामविश्वस्ताश्छिद्रेषु प्रहरन्त्यपि ॥ ४।२।२२ कपटानें संचार करणाऱ्या शत्रंचा मनुष्याने शोध घेत रहावे. कारण, ते सावध राहून, संधि सांपडली असतां, विश्वास पावलेल्या (शत्रु) जनांवर प्रहार करण्यास चुकत नाहीत.
For Private And Personal Use Only