Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि १९ अनिर्वेदः श्रियो मूलमनिर्वेदः परं सुखम् ॥५।१२।१० उत्साह हे संपत्तीचे कारण होय, आणि उत्साह म्हणजेच परम सुख होय. २० अनिर्वेदो हि सततं सर्वार्थेषु प्रवर्तकः ।
करोति सफलं जन्तोः कर्म यच करोति सः ॥५।१२।११ सर्व गोष्टींची प्रवृत्ति होण्याला उत्साह हेच एक नेहमींचे कारण आहे. प्राणी जे काही कर्म करितो, ते त्याचे कर्म हाच उत्साह सफल करितो. २१ अनुवन्धमजानन्तः कर्मणामविचक्षणाः ।
शीघ्रमेव विनश्यन्ति यथा त्वं विनशिष्यसि ॥३५१।२६ (जटायु पक्षी रावणाला म्हणतो) जे मूढ पुरुष आपल्या कृत्यांच्या परिणामाकडे लक्ष देत नाहीत ते तुझ्याप्रमाणे सत्वरच नाश पावतात. २२ अन्तं नोक्तपूर्व मे न च वक्ष्ये कदाचन ।
एतत्ते प्रतिजानामि सत्येनैव शपाम्यहम् ॥ ४।७।२२ (राम सुग्रीवाला म्हणतो) आजपर्यंत मी पूर्वी कधीं अनृत भाषण केले नाही, आणि पुढेही कधी करणार नाही, हे मी तुला प्रतिज्ञेनें सांगतों व यासंबंधी सत्याची शपथ वाहतो. २३ अन्तकाले हि भूतानि मुद्यन्तीति पुरा श्रुतिः।
राज्ञैवं कुर्वता लोके प्रत्यक्षा साश्रुतिः कृता॥२।१०६।१३ (भरत रामाला म्हणतो-दशरथ पित्याने कैकेयीचे म्हणणे मान्य केले-यावरून) अंतकाल प्राप्त झाला असतां प्राण्यांची बुद्धि विपरीत होते, असें पूर्वीपासून ऐकिवांत आहे; आणि ही गोष्ट, असें करणा-या राजानें, आज लोकांत सिद्ध करून दाखविली आहे.
For Private And Personal Use Only