Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२४ अपक्षो हि कथं पक्षी कर्म किंचित्समारभेत् ॥ ४५९।२३
(गृध्रराज संपाति वानरांना सांगतो) पंख नाहींतसे झालेला पक्षी कांहीं पराक्रमाचे कृत्य करण्यास प्रवृत्त होणार कसा? २५ अप्यहं जीवितं जह्यां त्वां वा सीते सलक्ष्मणाम् ।
न तु प्रतिज्ञां संश्रुत्य ब्राह्मणेभ्यो विशेषतः॥३।१०।१८ ( राम म्हणतो) हे सीते, मी तुझा, लक्ष्मणाचा, व स्वतःच्या जीविताचाही त्याग करीन. परंतु कोणाजवळ, विशेषतः ब्राह्मणांजवळ, केलेल्या प्रतिज्ञेचा त्याग कधीही करणार नाही. २६ अप्यहं जीवितं जह्यां युष्मान्वा पुरुषर्षभाः।
अपवादभयाद्रीतः किं पुनर्जनकात्मजाम् ॥७।४५।१४ ( राम बंधूंना म्हणतो) पुरुषश्रेष्ठांनो, लोकापवादाला भिऊन मी स्वजीविताचा व तुमचाहि त्याग करीन; मग जनककन्येचा त्याग करीन, यांत आश्चर्य तें काय? .. २७ अप्येव दहनं स्पृष्ट्वा वने तिष्ठन्ति पादपाः।
राजदण्डपरामृष्टास्तिष्ठन्ते नापराधिनः ॥ ६।२९।१२ अग्नीने स्पर्श केलेले वृक्षही वनांत राहतात, परंतु राजदंडास पात्र झालेले अपराधी (जिवंत ) राहात नाहीत. २८ अप्रमत्तश्च यो राजा सर्वज्ञो विजितेन्द्रियः ।
कृतज्ञो धर्मशीलश्च स राजा तिष्ठते चिरम् ।।३।३३।२० जो राजा ( सर्वदा) सावधान, सर्वज्ञ, जितेंद्रिय, कृतज्ञ आणि धर्मशील असतो, तो राज्यावर चिरकाल स्थिर राहातो. २९ अप्रमत्तो बले कोशे दुर्गे जनपदे तथा ।
भवेथा गुह राज्यं हि दुरारक्षतमं मतम् ॥ २।५२/७२ (राम म्हणतो) हे गुहा, तूं सैन्य, कोश, किल्ले, तसेच देश यांसंबंधाने सावधान रहा. कारण, राज्याचे रक्षण करणे म्हणजे अत्यंत कठीण होय, असें मानिले आहे.
For Private And Personal Use Only