Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
wwwmu.........
५१ अहितं च हिताकारं धाष्टजिल्पन्ति ये नराः ।
अवश्यं मन्त्रबाह्यास्ते कर्तव्याः कृत्यदूषकाः॥६।६३।१६ जे कोणी वस्तुतः अहितप्रद, परंतु बाहेरून हितकारक वाटण्याजोगें भाषण धाष्टानें करितात, ते कार्यनाशक होत. त्यांस आपल्या विचारांत-सल्लामसलतींत-घेऊ नये. ५२ अहिरेव अहेः पादान्विजानाति न संशयः॥ ५।४२।९ सर्पाचे पाय-चरणरहित गति-सर्पच जाणतो, यांत संशय नाही. ५३ अहो तम इवेदं स्यान्न प्रज्ञायेत किंचन ।
राजा चेन भवेल्लोके विभजन्साध्वसाधुनी ॥२।६७३६ चांगले आणि वाईट याची निवड करणारा राजा जर पृथ्वीवर नसेल, तर सर्वच अंधार होईल, आणि (कार्याकार्य) कांहींच समजणार नाही. ५४ अहोरात्राणि गच्छन्ति सर्वेषां प्राणिनामिह ।
आयूंषि क्षपयन्त्याशु ग्रीष्मे जलमिवांशवः।।२।१०५।२० ग्रीष्म ऋतूंत उदकाचा नाश करणान्या ( सूर्य ) किरणांप्रमाणे या मृत्युलोकों निघून जाणा-या दिवसरात्री सर्व प्राण्यांच्या आयुष्याचा शीघ्र नाश करितात. ५५ आकारश्छाद्यमानोऽपि न शक्यो विनिगुहितुम् ।
बलाद्धि विवृणोत्येव भावमन्तर्गतं नृणाम् ॥ ६।१७।६४ मनुष्याने आपला आकार-हर्षविकारादि मनोभावनांनी चेह-यावर होणारा फेरफार-आंवरून धरण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी तो आंवरतां येत नाही. तो आकार, मनुष्यांचा अंतर्गत (चांगला वाईट) भाव कशाना कशा प्रकारे प्रगट करितोच.
For Private And Personal Use Only