Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीरामायणसुभाषितानि
९ अतुष्टं स्वेषु दारेषु चपलं चपलेन्द्रियम् । नयन्ति निकृतिप्रज्ञं परदाराः पराभवम् ।। ५।२१।८ स्वस्त्रीचे ठायीं असंतुष्ट, अजितेंद्रिय, विपरीत बुद्धीच्या, चंचल मनाचे पुरुषास परस्त्रिया अपकीर्तीस पांचवितात.
३
१० अत्येति रजनी या तु सा न प्रतिनिवर्तते ।
यात्येव यमुना पूर्ण समुद्रमुदकार्णवम् ।। २ । १०५/१९ ज्याप्रमाणें उदकाने परिपूर्ण भरलेल्या समुद्राकडे यमुना नदी जाते ती कधीं मांगें परतून येत नाहीं, त्याप्रमाणें जी रात्र एकदां . निघून जाते, ती पुनः परत येत नाहीं.
११ अथवा किं ममैतेन राज्यद्रव्यमयेन तु ।
उद्धृतं मे स्वयं तोयं व्रतादेशं करिष्यति || २|२२|२८ ( राम लक्ष्मणाला म्हणतो वनवासाच्या व्रताचा संकल्प करण्यासाठी मी या अभिषेक जलानें स्नान करीन ) अथवा राज्यांतील द्रव्य ज्याकरितां खर्ची पडलें आहे असें हें उदक तरी मला कशाला पाहिजे ? मी स्वतः आणिलेल्या उदकानेंच माझा व्रतग्रहणाचा संकल्प होईल.
१२ अथात्मपरिधानार्थं सीता कौशेयवासिनी ।
संप्रेक्ष्य चीरं संत्रस्ता पृषती वागुरामिव || २|३७/९
( राम व लक्ष्मण यांनी वल्कले स्वीकारली ) नंतर पैठणी नेसलेली सीता आपल्याला नेसण्याकरितां (कैकेयीनें ) आणून दिलेले वल्कल पाहून, जाळे पाहिल्यावर त्रस्त होणाऱ्या हरिणीप्रमाणें त्रस्त झाली. १३ अधर्मः सुमहान्नाथ भवेत्तस्य तु भूपतेः ।
यो हरेद्वलिषड्भागं न च रक्षति पुत्रवत् || ३|६|११ ( तपस्वी ऋषि रामाला म्हणतात ) हे नाथ, जो राजा प्रजेपासून उत्पन्नाचा सहावा भाग करभार म्हणून घेऊन तिचें पुत्रवत् पालन करीत नाहीं, तो त्याचा मोठा अधर्म होय.
For Private And Personal Use Only