Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
मंगलाचरणम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् । लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥
हर्ता आपत्तींचा, दाता निखिलार्थसिद्धिचा तेवीं । . श्रीराम लोकनंदन, तच्चरणां नित्य नित्य मी सेवीं॥
१ अकुर्वन्तोऽपि पापानि शुचयः पापसंश्रयात् ।का. स. श्लो.
परपापविनश्यन्ति मत्स्या नागदे यथा ॥ ३॥३८॥२६ ज्याप्रमाणेसर्प असलेल्या डोहांतील मासे नाश पावतात, त्याप्रमाणे स्वतः शुचिर्भूत व पापकर्म न करणारे असेहि लोक पापीजनांचा आश्रय केल्यामुळे त्या दुसन्यांच्या पातकांनी नाश पावतात. २ अकृतात्मानमासाद्य राजानमनये रतम् ।
समृद्धानि विनश्यन्ति राष्ट्राणि नगराणि च ॥५।२१।११ ज्याच्या चित्ताला ज्ञानाचा संस्कार नाही, व जो अनीतीचे ठायीं आसक्त झालेला आहे, अशा राजाची प्राप्ति झाली असतां, समृद्ध राष्ट्र आणि नगरे नाश पावतात. ३ अग्नि प्रज्वलितं दृष्ट्वा वस्त्रेणाहर्तुमिच्छसि ।
कल्याणवृत्तां यो भायां रामस्याहर्तुमिच्छसि ३।४७।४३ (सीता रावणाला म्हणते ) ज्याअर्थी तूं रामाच्या सदाचरणी भार्येला हरण करण्याचे इच्छितोस, त्याअर्थी तूं प्रदीप्त झालेला आग्नि पाहून, त्याला वस्त्राने बांधून आणण्याचीच इच्छा करीत आहेस.
For Private And Personal Use Only