Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१०२७ स्ववीर्य यः समाश्रित्य समाह्वयति वै परान् ।
अभीतो युध्यते शत्रून् स वै पुरुष उच्यते ॥५।१६३३३ स्वतःच्या सामर्थ्याचा आश्रय करून जो शāना युद्धाला आव्हान करतो आणि न भितां लढतो तोच खरा पुरुष म्हणावयाचा. १०२८ स्वार्थे सर्वे विमुह्यन्ति येऽपि धर्मविदो जनाः ॥ ४॥५१॥४
स्वार्थाचा मोह सर्वांना-जे धर्म जाणणारे त्यांनासुद्धां-पडत असतो. १०२९ स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः॥६॥४२।४५
आपआपले कर्तव्य आनंदाने करीत राहिल्याने मनुष्यास परमसिद्धि प्राप्त होते. १०३० हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥ ६।२६।३७ [ श्रीकृष्ण सांगतात ] अर्जुना, तुला जर युद्धात मरण आले तर स्वर्ग मिळेल, आणि तुझा जय झाला तर साऱ्या पृथ्वीचें राज्य तूं भोगशील. यासाठी, हे कुंतीपुत्रा, युद्धाचा निश्चय करून ऊ. १०३१ हर्षो योधगणस्यैको जयलक्षणमुच्यते ॥ ६।३।७५
सर्व सैनिकांना लढण्याचा हुरूप वाटणे हेच जय मिळण्याचे मुख्य लक्षण होय. १०३२ हितं यत्सर्वभूतानामात्मनश्च सुखावहम् ।
तत्कुयोदीश्वरे ह्येतन्मूलं सवाथसिद्धये ॥ ५॥३७४० सर्व भूतांना जें हितकर आणि स्वतःलाहि सुखावह तेच ईश्वरार्पणबुद्धीने करीत असावें. कारण, हेच सर्व गोष्टी सिद्धीस जाण्याचे मूळ आहे.
--
For Private And Personal Use Only