Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१६२
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१०१४ सुलभाः पुरुषा राजन्सततं प्रियवादिनः ।
अप्रियस्य तु पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः।।५।३७११५ [विदुर धृतराष्ट्राला म्हणतो.] हे राजा, सतत प्रिय भाषण करणारे पुष्कळ आढळतात; परंतु अप्रिय असले तरी हितकर असेल तेंच सांगणारा विरळा, आणि ऐकणारा त्याहूनहि विरळा. १०१५ सूक्ष्मा गतिर्हि धर्मस्य दुर्जेया ह्यकृतात्मभिः १३।१०।६८
धर्माचे स्वरूप अत्यंत सूक्ष्म असून मनोजय ज्यांनी केलेला नाही त्यांस तें समजणे कठिण. १०१६ सेनापतौ यशो गन्ता न तु योधान्कथंचन।।५।१६८।२८
यशाचे श्रेय नेहमीं सेनापतीला मिळणार, सैनिकांना कधीच नाही. १०१७ सोपानभूतं स्वर्गस्य मानुष्यं प्राप्य दुर्लभम् ।
तथात्मानं समादध्याद्मश्यते न पुनर्यथा।।१२।३२११८० स्वर्गास जाण्याचा [ जणूं ] जिनाच अशा मनुष्यजन्माला येऊन परमात्म्याकडे असें ध्यान लावावे की, जेणेकरून स्थानभ्रष्ट होण्याचा प्रसंग पुनश्च येणार नाही. १०१८ सौहदान्यपि जीर्यन्ते कालेन परिजीयतः ॥ १।१३११६
कालांतराने मनुष्य जीर्ण होतो तसा स्नेह सुद्धा कमी होत असतो. १०१९ स्थापयेदेव मर्यादा जनचित्तप्रसादिनीम् ।
__ अल्पेऽप्यर्थे च मर्यादा लोके भवति पूजिता १२।१३३३१३ लोकांची अंतःकरणे प्रसन्न राहतील अशाच प्रकारचे नियम केले पाहिजेत. लहानसहान गोष्टींतसुद्धां नियम असलेला लोकांना मान्य होतो.
For Private And Personal Use Only