Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
-
V
i
s..
.....
.
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि १०२० स्तेयं कुर्वश्च गुर्वर्थमापत्सु न निषिध्यते ।
बहुशः कामकारेण न चेयः संप्रवर्तते ॥ १२॥३४।२३ आपत्कालीं गुरुदक्षिणा देण्यासाठी चोरी करणे हे निषिद्ध नाही. मात्र मनुष्याने बुद्धिपूर्वक अनेकवार तसे करण्यास प्रवृत्त होऊ नये. १०२१ स्त्रियो यत्र च पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः॥१३॥४६॥५
जेथें स्त्रियांचा गौरव होतो तेथें देवता रममाण होतात. १०२२ स्वबाहुबलमाश्रित्य योभ्युज्जीवति मानवः ।
स लोके लभते कीर्ति परत्र च शुभां गतिम् ॥ ५।१३३।४५ __ आपल्या बाहुबळाचा आश्रय करून जो मनुष्य आत्मोद्धार करून घेतो, त्याची इहलोकी कीर्ति होऊन त्याला परलोकी उत्तम गति मिळते. १०२३ स्वभावनियतं कर्म कुर्वन्नामोति किल्बिषम् ॥६॥४२॥१७ __ स्वभावतः ठरलेलें कर्म करण्यांत पाप लागत नाही. १०२४ स्वमांसं परमांसेन यो वर्धयितुमिच्छति । ।
नास्ति क्षुद्रतरस्तस्मात्स नृशंसतरो नरः।।१३।११६।११ दुसऱ्याचे मांस भक्षण करून आपलें मांस वाढविण्याची जो इच्छा करतो, त्याच्यासारखा नीच कोणी नाही. तो मनुष्य अत्यंत दुष्ट होय. १०२५ स्वयमुत्पद्यते जन्तुः स्वयमेव विवर्धते ।
सुखदुःखे तथा मृत्युंस्वयमेवाधिगच्छति॥१२।२८८।१६ प्राणी स्वतःच जन्म घेतो, स्वतःच वाढतो. तसेंच सुखदुःखें आणि मृत्यु त्याला स्वतःलाच प्राप्त होत असतात. १०२६ स्वयं प्राप्ते परिभवो भवतीति विनिश्चयः॥ १३॥८२।१४
[ दुसऱ्याने न बोलावितां ] आपण होऊन जर कोणी दुसऱ्याकडे गेले तर त्याचा अपमान होतो, हे अगदी निश्चित होय.
For Private And Personal Use Only