Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
marwammmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm १००३ सुखं मोक्षसुखं लोके न च मूढोऽवगच्छति ।
प्रसक्तः पुत्रपशुषु धनधान्यसमाकुलः ॥ १२॥२८८५ ___ खरे सुख म्हणजे मोक्षसुख. परंतु मूढ मनुष्याला हे समजत नाही. तो जगांत पुत्र, पश्वादि संपत्ति यांतच गुंतून राहतो आणि धन, धान्य इत्यादिकांतच गढून गेलेला असतो. १००४ सुखस्यानन्तरं दुःखं दुःखस्यानन्तरं सुखम् ।
पर्यायेणोपसर्पन्ते नरं नेमिमरा इव ॥ ३॥२६१।४९ चाकाच्या धावेमध्ये एकामागून एक अरे येत असतात त्याप्रमाणे सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख आळीपाळीनें मनुष्यांना प्राप्त होत असते. १००५ सुखाद्बहुतरं दुःखं जीविते नास्ति संशयः।
स्निग्धस्य चेन्द्रियार्थेषु मोहान्मरणमप्रियम्॥१२।२०५।६ आयुष्यात सुखापेक्षा दुःखच पुष्कळ अधिक आहे यांत संशय नाही. परंतु मोहाने इंद्रियांच्या विषयाच्या ठिकाणी आसक्त होऊन राहिल्यामुळे मनुष्याला मरण अप्रिय वाटते. १००६ सुखार्थिनः कुतो विद्या
नास्ति विद्यार्थिनः सुखम् ।।५।४०१७ सुखच्छु पुरुषाला विद्या कोठून प्राप्त होणार ? आणि विद्यची इच्छा करणाऱ्याला सुख कोठून मिळणार ? १००७ सुतेषु राजन्सर्वेषु हीनेष्वभ्याधिका कृपा ॥३।९।१९
[व्यासमुनि धृतराष्ट्राला म्हणतात ] हे राजा, सर्व मुलांत जे गुणहीन असतील त्यांची ( आईबापांना ) काळजी अधिक. १००८ सुपूरा वै कुनदिका सुपूरो मुषिकाञ्जलिः ।
सुसन्तोषःकापुरुषः स्वल्पकेनैव तुष्यति ॥ ५।१३३।९ - लहानसा ओढा पाण्याने तेव्हांच भरून जातो. उंदराची ओंजळ सहज भरते. स्याचप्रमाणे क्षुद्र मनुष्यहि सहज संतुष्ट होत असून त्याचे थोडक्यानेच समाधान होते.
For Private And Personal Use Only