Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१५८
सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि
९९३ साम्याद्धि सख्यं भवति वैषम्यान्नोपपद्यते ॥ १।१३१।६७ कांहींतरी सारखेपणा असेल तेव्हां सख्य होते; विषमता असेल तर ते शक्य नाहीं. ९९४ सायं प्रातर्मनुष्याणामशनं वेदनिर्मितम् ।
नान्तरा भोजनं दृष्टमुपवासी तथा भवेत् || १२।१९३।१०
मनुष्यांनी सकाळ संध्याकाळ भोजन करावें, असा नियम वेदाने घालून दिलेला आहे. मध्यंतरीं कांहीं खाऊं नये, अशा रीतीनें जो राहतो तो उपवासीच असतो. ९९५ साहसोत्पतितानां च निराशानां च जीविते ।
न शक्यमग्रतः स्थातुं शक्रेणापि धनंजय || ९ |५८/१६
( श्रीकृष्ण म्हणतात ) हे अर्जुना, जिवावर उदार होऊन साहसाने हल्ला करणाऱ्यांच्या पुढे उभे राहण्याची इंद्राची सुद्धां प्राज्ञा नाहीं.
९९६ सिंहस्य सततं पार्श्वे सिंह एवानुगो भवेत् ।
असिंहः सिंहसहितः सिंहवल्लभते फलम् || १२|११९।११ यस्तु सिंहः श्वभिः कीर्णः सिंहकर्मफले रतः ।
न स सिंहफलं भोक्तुं शक्तः श्वभिरुपासितः ।। १२।११९/१२
सदोदित सिंहाच्या संनिध असणारा त्याचा अनुचर सिंहच बनतो. सिंह ज्याच्या बरोबर आहे तो स्वतः सिंह नसला तरी त्याला सिंहाप्रमाणेच फल मिळतें, परंतु जो स्वतः सिंह असूनही कुत्र्यांच्या जमावांत राहतो आणि सिंहाप्रमाणे कर्मफल मिळण्याची इच्छा करतो, त्याला कुत्र्यांच्या सहवासांत असेपर्यंत तसें फळ मिळणें शक्य नाहीं.
९९७ सुखं वा यदि वा दुःखं प्रियं वा यदि वाऽप्रियम् ।
प्राप्तं प्राप्तमुपासीत हृदयेनापराजितः || १२|२५|२६
सुख असो किंवा दुःख असो, प्रिय असो अथवा अप्रिय असो जें जें म्हणून " प्राप्त होईल त्याचा, मनांतून नाउमेद न होतां स्वीकार करावा.
"
For Private And Personal Use Only