Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
९८७ सर्वो हि लोको नृपधर्ममूलः || १२|१२०।५६
सर्व लोकांना राजधर्म हा आधारभूत आहे.
९८८ सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् । सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः || ६ |४२।४८
[ श्रीकृष्ण सांगतात. ] अर्जुना, स्वभावतः प्राप्त झालेलें कर्म सदोष असलें तरी, त्याचा त्याग करूं नये, कारण, अग्नि जसा धुरानें वेष्टिलेला असतो, तसा प्रत्येक कर्मात कांहींना काही दोष हा असतोच.
९८९ सहस्रशक्तिश्च शतं शतशक्तिर्दशापि च ।
दद्यादपश्च यः शक्त्या सर्वे तुल्यफलाः स्मृताः १४/९० १९७ ज्याच्याजवळ एक हजार रुपये आहेत त्यानें शंभर दिले, किंवा ज्याच्यापाशीं शंभर आहेत त्यानें दहा दिले आणि ज्याच्यापाशीं कपर्दिकहि नाहीं त्यानें यथाशक्ति नुसतें ओंजळभर पाणी दिलें, तर या तिघांस सारखेंच फळ मिळतें. ९९० सहायबन्धना ह्यर्थाः सहायाश्चार्थबन्धनाः ।
अन्योन्यबन्धनावेतौ विनान्योन्यं न सिध्यतः || ५|३७|३८
द्रव्य साहाय्यकर्त्यांवर अवलंबून असून साहाय्यकर्ते द्रव्यावर अवलंबून असतात. सारांश, परस्परांवर अवलंबून असलेल्या या दोन गोष्टी परस्परांवांचून सिद्ध होत नाहींत.
१५७
९९१ साङ्गोपाङ्गानपि यदि यश्च वेदानधीयते ।
वेदवेद्यं न जानीते वेदभारवहो हि सः ।। १२ । ३१८/५० सर्व अंगें आणि उपांगें यांसहित चारहि वेदांचें ज्यानें अध्ययन केलें, परंतु वेदांनीं जाणावयाचें जें परमात्मतत्त्व तें ज्याने जाणलें नाहीं, तो केवळ वेदग्रंथाचा भार वाहणारा होय.
९९२ सा भार्या या प्रियं ब्रूते स पुत्रो यत्र निर्वृतिः ।
तन्मित्रं यत्र विश्वासः स देशो यत्र जीव्यते ॥ १२।१३९/९६
जी प्रिय भाषण करते तीच भार्या, जो सुखाला कारण होतो तोच पुत्र, ज्याच्यावर विश्वास ठेवितां येतो तोच मित्र, आणि ज्या ठिकाणी उपजीविका होते तोच देश.
For Private And Personal Use Only