Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१५५
९७१ सर्व बलवतां पथ्यं सर्व बलवतां शुचि ।
सर्व बलवतां धर्मः सर्व बलवतां स्वकम् ॥ १५।३०।२४ बलसंपन्न असलेल्यांना सर्व काही हितकर आणि सर्व काही पवित्र आहे. पाहिजे तो त्यांचा धर्म आणि सर्व काही त्यांच्या सत्तेचें! ९७२ सर्व बलवतो वशे ॥ १२।१३४।३
सर्व काही बलवानाच्या हाती असतें. ९७३ सर्वस्य जीवलोकस्य राजधर्मः परायणम् । १२।५६।३
सर्व जीवसृष्टीला राजधर्म हाच मोठा आधार आहे. ९७४ सर्वस्य हि स्वका प्रज्ञा साधुवादे प्रतिष्ठिता।।
परबुद्धिं च निन्दन्ति स्वां प्रशंसन्ति चासकृत् ॥ १०३५ ज्याला त्याला स्वतःची बुद्धि सांगते, ते योग्य, असे ठाम वाटते. सर्वजण दुसऱ्याच्या बुद्धीची निंदा करितात, आणि स्वतःच्या बुद्धीची वारंवार प्रशंसा करितात. ९७५ सर्वस्वमपि संत्यज्य कार्यमात्महितं नरैः॥१२॥१३९।८४
सर्वस्वाचा त्याग करून सुद्धां मनुष्यांनी आत्मकल्याण साधावें. ९७६ सवः सर्व न जानाति सवज्ञो नास्ति कश्चन ।
नैकत्र परिनिष्ठास्ति ज्ञानस्य पुरुषे कचित् ॥ ३।७२।८ सर्वांनाच सर्व गोष्टींचे ज्ञान नसते. सर्वज्ञ असा कोणीच नाही. कोणाहि एकाच मनुष्याच्या ठिकाणी सर्व ज्ञान एकवटलेले नाही. ९७७ सर्वा विद्या राजधर्मेषु युक्ताः
सर्वे लोका राजधर्मे प्रविष्टाः ॥ १२॥६३।२९ सर्व विद्यांचा राजधर्माशी संबंध आहे. आणि सर्व प्रकारचे लोकव्यवहार राजधर्माशी निगडित झालेले आहेत. ९७८ सर्वे क्षयान्ता निचयाः पतनान्ताः समुच्छ्रया,
संयोगा विप्रयोगान्ता मरणान्तं हि जीवितम् ॥१२२७॥३१ सर्व प्रकारच्या संचयांचा शेवट क्षयांत होत असतो, चढण्याची अखेर पडण्यांत होते, संयोगांचे पर्यवसान वियोगांत आणि जीविताचा अंत मरणांत होत असतो.
For Private And Personal Use Only