Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१५६ सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि ९७९ सर्वेण खलु मर्तव्यं मर्त्यलोके प्रसूयता।
कृतान्तविहिते मार्गे मृतं को जीवयिष्यति।।१२।१५३११३ मृत्युलोकांत जन्मास येणाऱ्या प्रत्येकाला खचित मरावयाचे आहे, हा मार्ग कृतांतानें [ यमाने ] ठरविला असल्यामुळे मेलेल्याला जिवंत कोण करणार ? ९८० सर्वे धर्मा राजधर्मप्रधानाः ॥१२॥६३।२७
सर्व धर्मांमध्ये राजधर्म हा अग्रगण्य आहे. ९८१ सर्वे लाभाःसाभिमाना इति सत्यवती श्रुतिः।१२।१८०१० ___ सर्व प्रकारच्या लाभाच्या मुळाशी अहंकारबुद्धि असते, अशी श्रुति आहे ती यथार्थ आहे. ९८२ सर्वेषां कृतवैराणामविश्वासः सुखोदयः॥१२॥१३९।२८
आपणांशी वैर करणाऱ्या कोणाचाहि विश्वास न धरल्याने सुख होते. ९८३ सर्वो दण्डजितो लोको दुर्लभो हि शुचिर्जनः ।
दण्डस्य हि भयाद्भीतो भोगायैव प्रवर्तते ॥१२॥१५॥३४ सर्व लोक दंडाच्या योगाने वठणीवर येतात. स्वभावतःच शुचिर्भूत असलेला मनुष्य विरळा. खरोखर, दंडाच्या भयानेच कोणी झाला तरी, आपलें ठरलेले काम करीत असतो. ९८४ सर्वोपायैरुपायज्ञो दीनमात्मानमुद्धरेत् ॥ १२॥१४१।१००
चतुर पुरुषानें हरप्रयत्न करून हीन स्थितीतून आपला उद्धार करावा. ९८५ सर्वो विमृशते जन्तुः कृच्छ्रस्थो धर्मदर्शनम् ।
पदस्थः पिहितं द्वारं परलोकस्य पश्यति ॥ ९॥३२॥५९ कोणीहि मनुष्य संकटांत सांपडला, म्हणजे मग धर्मशास्त्राचा विचार करू लागतो. उच्चस्थितीत असतांना त्याला स्वर्गाचे द्वार बंद असलेलेच दिसते. ९८६ सर्वो हि मन्यते लोक आत्मानं बुद्धिमत्तरम् ॥१०।३।४ प्रत्येक मनुष्य स्वतःला अधिक शहाणा समजतो.
For Private And Personal Use Only