Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१५४
सार्थ श्रीमहाभारत सुभाषितानि
९६४ सर्वतीर्थेषु वा स्नानं सर्वभूतेषु चार्जवम् ।
उभे त्वेते समे स्यातामार्जवं वा विशिष्यते ।। ५।३५।२ सर्व तीर्थात स्नान करणें आणि सर्वांशीं निष्कपटानें वागणे या दोहोंची योग्यता सारखीच. कदाचित् निष्कपटपणाच कांकणभर श्रेष्ठ ठरेल.
९६५ सर्वथा धर्ममूलोऽर्थो धर्मश्वार्थपरिग्रहः ।
इतरेतर योनीतौ विद्धि मेघोदधी यथा || ३|३३|२९
( भीम युधिष्ठिराला म्हणतात. ) अर्थ हा सर्वस्वी धर्ममूलक असून धर्म हा अर्थावर अवलंबून आहे. सारांश, मेघ व समुद्र यांप्रमाणे धर्म व अर्थ हे परस्परांवर अवलंबून आहेत.
९६६ सर्वथानार्यकमैतत्प्रशंसा स्वयमात्मनः || ५/७६।६ आपली आपण प्रशंसा करणें हें सर्वस्वी अनार्य माणसाचें काम होय.
९६७ सर्वथा संहतैरेव दुर्बलैर्बलवानपि ।
अमित्रः शक्यते हन्तुं मधुहा भ्रमरैरिव || ३|३३|७० पोळ्यांतील मध काढणाऱ्याचा मधमाशा एकजुटीनें [ तुटून पडून ] प्राण घेतात. त्याप्रमाणें सर्वांची पूर्ण एकी असेल तर दुर्बळ लोक देखील बलिष्ठ अशाहि शत्रूला ठार करूं शकतात.
९६८ सर्वभूतहितः साधुरसाधुर्निर्दयः स्मृतः || ३ | ३१३ / ९२
सर्व भूतांच्या हितासाठीं झटतो तो साधु आणि निर्दयतेनें वागतो तो असाधु (दुष्ट) होय.
९६९ सर्वभूतेषु सस्नेहो यथात्मनि तथाऽपरे ।
ईदृशः पुरुषोत्कर्षो देवि देवत्वमश्नुते || १३ | १४४|५८
( महेश्वर म्हणतात. ) हे देवि, पार्वति, जो सर्व प्राण्यांविषयीं वत्सलता धारण करतो आणि आपल्यासारखेच सर्व भूतांना मानतो, तो श्रेष्ठ पुरुष देवत्वाला पोंचतो. ९७० सर्व प्रियाभ्युपगतं धर्ममाहुर्मनीषिणः ।। १२ । २५९/२५
ज्या ज्या योगानें दुसऱ्याचें प्रिय होईल ती ती प्रत्येक गोष्ट धर्मच होय असें ज्ञाते लोक सांगतात.
For Private And Personal Use Only