Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१५३
९५७ समुच्छये यो यतते स राजन् परमो नयः॥२॥५५।११
[ दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणतो ] हे राजा, भाग्योदय करण्याकडे जिची प्रवृत्ति असते तीच नीति श्रेष्ठ होय. ९५८ संपन्नतरमेवानं दरिद्रा भुञ्जते सदा ।
क्षुत्स्वादुतां जनयति सा चाढ्येषु सुदुर्लभा ।।५।३४।५० दरिद्री लोक नेहमीच अतिशय मिष्टान्नभक्षण करीत असतात. कारण भुकेने तोंडाला चव येत असते. आणि तीतर श्रीमंतांना फारच दुर्लभ. ९५९ संप्रीतिभोज्यान्यन्नानि आपद्भोज्यानि वा पुनः।।५।९।२५
प्रेम असल्यास अथवा कांही आपत्ति असल्यास एकाने दुसऱ्याकडचे अन्न भक्षण करावें. ९६० संभावितस्य चाकीर्तिमरणादतिरिच्यते ॥ ६॥२६॥३४
संभावित पुरुषाची अपकीर्ति होणे मरणापेक्षा वाईट. ९६१ संभोजनं संकथनं संप्रश्नोऽथ समागमः ।
एतानि ज्ञातिकार्याणि न विरोधः कदाचन ॥ ५।६४।११ एकत्र भोजन करणे, एकत्र गप्पागोष्टी करणे, एकमेकांस प्रश्न विचारणे आणि भेट देणे या गोष्टी ज्ञातिबांधवांनी कराव्या. केव्हांहि परस्परांशी विरोध करू नये. ९६२ सर्वकालं मनुष्येण व्यवसायवता सदा।
पीडाकरममित्राणां यत्स्यात्कर्तव्यमेव तत् ॥७१४३।६८ ज्या ज्या गोष्टीमुळे शत्रूना पीडा होईल ती प्रत्येक गोष्ट मनुष्याने सर्वकाळी मुद्दाम यत्नपूर्वक केली पाहिजे. ९६३ सर्व जिलं मृत्युपदमार्जवं ब्रह्मणः पदम् ।
एतावाज्ञानविषयः किं प्रलापः करिष्यति॥१२१७९।२१ कपटाने युक्त असलेले सर्व काही मरणाला कारण होते. सरळपणांत ब्रह्मप्राप्ति आहे. जे काय जाणावयाचें तें एवढेच. जास्त बोलण्यात काय अर्थ ?
For Private And Personal Use Only