Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीमहाभारत सुभाषितानि
९९८ सुखं सुखेनेह न जातु लभ्यं । दुःखेन साध्वी लभते सुखानि ||३| २३४ | ४
[ द्रौपदी सत्यभामेस सांगते ] इहलोकीं सुखासुखीं सुख लाभणें कधींच शक्य नाहीं. दुःख सोसल्यानेंच साध्वीला सुखप्राप्ति होत असते.
९९९ सुखं च दुःखं च भवाभवौ च । लाभालाभौ मरणं जीवितं च । पर्यायशः सर्वमेते स्पृशन्ति
तस्माद्धीरो न च हृष्येन्न शोचेत् || ५ | ३६ |४७
सुख आणि
दुःख, उत्कर्ष आणि -हास, फायदा आणि तोटा, उत्पत्ति आणि लय ह्रीं क्रमाक्रमानें सर्वानाच प्राप्त होत असतात. म्हणून शहाण्यानें त्याविषयीं हर्षहि मानूं - नये आणि शोक पण करूं नये.
१००९ सुखं दुःखान्तमालस्यं
१५९
दाक्ष्यं दुःखं सुखोदयम् || १२|२७|३२
आळसांत [ प्रारंभीं ] सुख वाटतें पण त्याचा शेवट दुःखांत होतो. तत्परतेनें उद्योग करण्यांत [ प्रथम ] दुःख वाटलें तरी त्यापासून परिणाम सुख होतें.
१००१ सुखं निराशः स्वपिति नैराश्यं परमं सुखम् ।। १२/१७४|६२
ज्यानें आशा सोडली त्याला सुखाने झोप येते. निराशेसारखें सुख नाहीं.
१००२ सुखमेव हि दुःखान्तं कदाचिद्दुःखतः सुखम् ।
तस्मादेतद्वयं जह्याद्य इच्छेच्छाश्वतं सुखम् ||१२|२५/२४
सुखाचा अंत दुःखांतच होतो. उलट केव्हां केव्हां दुःखांतून सुखाचा उदय होतो. म्हणून ज्याला शाश्वत सुख हवे असेल त्याने या दोहोंचाहि त्याग करावा.
For Private And Personal Use Only