Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१३६
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
८४९ वशे बलवतां धर्मः सुखं भोगवतामिव ।
नास्त्यसाध्यं बलवता सर्वं बलवतां शुचि ॥१२॥१३४।८ सुख जसें भोगसाधनें अनुकूल असलेल्याच्या स्वाधीन, तसा धर्म - बलसंपन्न असलेल्यांच्या अधीन. ज्यांच्यापाशी बल आहे त्यांना असाध्य असे काहीच नाही. बलवान् असेल त्याचे सर्वच शुभ. ८५० वसन्विषयमध्येऽपि न बसत्येव बुद्धिमान् ।
संवसत्येव दुर्बुद्धिरसत्सु विषयेष्वपि ॥१२।२९८६ शहाणा मनुष्य विषयांच्या गराड्यांत राहूनहि न राहिल्यासारखा असतो. मूर्ख मनुष्य विषय जवळ नसतांहि त्यांत गुरफटल्याप्रमाणे असतो. ८५१ वहेदमित्रं स्कन्धेन यावत्कालस्य पर्ययः ।
प्राप्तकालं तु विज्ञाय भिन्द्याघटमिवाश्मनि ॥१२॥१४०११८ आपला काल उलट आहे तोवर शत्रूला खांद्यावर देखील बसवावें, परंतु योग्य काल आला आहेसे दिसून येतांच, मडके दगडावर आपटावें तसा, त्याचा चुराडा करून सोडावा. ८५२ वाक्शल्यं मनसो जरा ।। ५।३९/७९
वाग्बाणामुळे मनाला वार्धक्य येते. ८५३ वाक्संयमो हि नृपते सुदुष्करतमो मतः । ____ अर्थवच्च विचित्रं च न शक्यं बहुभाषितुम् ॥५॥३४७६
[विदुर धृतराष्ट्राला म्हणतो ] वाणीचा संयम करणे अत्यंत दुर्घट म्हणून म्हटले आहे. परंतु यथार्थे असून चटकदार असें भाषण पुष्कळ करणे शक्यहि नाही. ८५४ वाक्सायका वदनानिष्पतन्ति
यैराहतः शोचति राज्यहानि । परस्य नामर्मसु ये पतन्ति
तान्पण्डितो नावसृजेत्परेषु ।। १३।१०४।३२ वाग्बाण हे तोंडातून सुटत असतात. ते ज्याला लागले तो रात्रंदिवस तळमळत राहतो. यास्तव दुसऱ्याच्या वर्मी लागतील असे वाग्वाण सुज्ञ मनुष्याने दुसऱ्यावर केव्हांही टाकू नये.
For Private And Personal Use Only