Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
९०६ शुभं वा यदि वा पापं द्वेष्यं वा यदि वा प्रियम् ।
अपृष्टस्तस्य तद्रूयाधस्य नेच्छेत्पराभवम् ॥५॥३४।४ ज्याची हानि होऊ नये अशी आपल्याला इच्छा असते, त्याला त्याने जरी विचारिलें नसले तरी, त्याच्यासंबंधाने में आपणाला दिसत असेल ते सांगावे; मग तें शुभ असो अथवा अशुभ असो. आणि त्याचप्राणे त्याला प्रिय होवो अथवा अप्रिय होवो. ९०७ शुभं सर्वपवित्रेभ्यो दानमेव परं द्विज ॥१३॥१२०१६
(व्यास मैत्रेय मुनींना म्हणतात ) सर्व पवित्र वस्तूंपेक्षां दान हेच अत्यंत कल्याणकारक आहे. ९०८ शुभानामशुभानां च द्वौ राशी पुरुषर्षभ ।
यः पूर्व सुकृतं भुङ्क्ते पश्चानिरयमेव सः॥ १८३॥१३ (इंद्र युधिष्ठिराला म्हणतो.) पुण्य आणि पाप यांच्या दोन निरनिराळ्या राशी आहेत. यांपैकी सुकृत म्हणजे पुण्य जो प्रथम भोगतो, त्याच्या वाट्याला मागाहून नरकच येतो. ९०९ शुभेन कर्मणा सौख्यं दुःखं पापेन कर्मणा ।
कृतं भवति सर्वत्र नाकृतं विद्यते कचित् ॥ ११।२।३६ सत्कर्माने सुख आणि दुष्कर्माने दुःख प्राप्त होते. जे पूर्वी केले असेल तेंच केव्हां झाले तरी फलाला येणार. में केलें नाहीं त्याचें फळहि नाही. ९१० शुश्रूषुरपि दुर्मेधाः पुरुषोऽनियतेन्द्रियः ।
नालं वेदयितुं कृत्स्नौ धर्मार्थाविति मे मतिः ॥१०॥५॥१ तथैव तावन्मेधावी विनयं यो न शिक्षते ।
न च किंचन जानाति सोऽपि धर्मार्थनिश्चयम्॥१०५।२ ( कृपाचार्य अश्वत्थाम्याला म्हणतात.) मंद बुद्धीचा मनुष्य जिज्ञासु असला तरी इंद्रियांवर ताबा मिळविल्यावांचून तो धर्मार्थ पूर्णपणे जाणण्यास समर्थ होणार नाही, असे माझे मत आहे. तीच गोष्ट, ज्याच्या मनाला चांगले वळण लागलेले नाही अशा बुद्धिमान् मनुष्याची, त्याला सुद्धां धर्मार्थाचे निश्चित ज्ञान कधीच होत नाही.
म. भा. १०
For Private And Personal Use Only