Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१४९
९३२ श्रोतव्यं खलु वृद्धानामिति शास्त्रनिदर्शनम् ।
न त्वेव ह्यतिवृद्धानां पुनबाला हि ते मताः॥५॥१६८।२६ वृद्धांचे अवश्य ऐकावें असें शास्त्र सांगते; पण अतिवृद्ध झालेल्यांचे ऐकू नये. कारण त्यांची गणना पुनरपि बाल झालेल्यांतच केली पाहिजे. ९३३ श्रोत्रियस्येव ते राजन्मन्दकस्याविपश्चितः ।
अनुवाकहता बुद्धि षा तत्त्वार्थदर्शिनी ॥ १२॥१०११ [ भीमसेन धर्मराजाला म्हणतो ] एकाद्या मतिमंद मठ ब्राह्मणाची बुद्धि वेदांची अर्थशून्य घोकंपट्टी करण्याने नष्ट व्हावी तसा, राजा, तुझ्या बुद्धीला भ्रम झाला असून तिला खरे तत्त्व कळेनासे झाले आहे. ९३४ श्वःकार्यमद्य कुर्वीत पूर्वाह्ने चापराह्निकम् ।
न हि प्रतीक्षतेमृत्युः कृतं वास्य न वा कृतम्॥१२॥३२११७३ उद्यांचे कार्य आज करावें; तिसऱ्या प्रहरी करावयाचे ते सकाळी करावे. कारण मृत्यु कोणाचे काम झालें अगर न झाले हे पहात बसत नाही. ९३५ षड्दोषाः पुरुषेणेह हातव्या भूतिमिच्छता ।
निद्रा तन्द्री भयं क्रोध आलस्यं दीर्घसूत्रता ॥ ५।३३।७८ आपलें बरे व्हावे असे इच्छिणाऱ्या पुरुषाने सहा दोष टाळावे फार झोप, सुस्ती, भय, क्रोध, आळस आणि दीर्घसूत्रीपणा. . ९३६ स एव धर्मः सोऽधर्मो देशकाले प्रतिष्ठितः। ____ आदानमनृतं हिंसा धर्मो ह्यावस्थिकः स्मृतः ॥१२॥३६।११
योग्य वेळी आणि योग्य स्थळी जो धर्म ठरतो, तोच अयोग्य वेळी आणि अयोग्य स्थळी अधर्म होतो. चौर्यकर्म, असत्यभाषण, हिंसा या सर्वाची गोष्ट अशीच आहे. धर्म हा परिस्थितीप्रमाणे ठरवावा लागतो. ९३७ संयोगा विप्रयोगान्ता जातानां प्राणिनां ध्रुवम् ।
बुबुदा इव तोयेषु भवन्ति न भवन्ति च ॥१२।२७।३० जन्माला आलेल्या प्राण्यांच्या संयोगांची अखेर वियोगांतच होत असते. पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे, ते एकसारखे उत्पन्न होतात आणि नाहीसे होतात.
For Private And Personal Use Only