Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
९१८ श्रद्दधानः शुभां विद्या हीनादपि समाप्नुयात् ।
सुवर्णमपि चामेध्यादाददीताविचारयन् ॥ १२॥१६५।३१ चांगली विद्या हीन मनुष्यापासून देखील श्रद्धेने ग्रहण करावी. सोनें अपवित्र पदार्थाशी मिसळले असल्यास त्यांतूनही खुशाल काढून घ्यावे. ९१९ श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः॥ ६४१॥३
मनुष्य हा श्रद्धामय आहे ज्याची जशी श्रद्धा असेल तसा तो होतो. ९२० श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ६२८१३९ इंद्रिये ताब्यात ठेवून दक्षतेने प्रयत्न करणाऱ्या श्रद्धावान् मनुष्याला ज्ञान प्राप्त होतें. ज्ञान प्राप्त झाल्यावर लवकरच त्याला परमशांतीचा लाभ होतो. ९२१ श्रिय एताः स्त्रियो नाम सत्कार्या भूतिमिच्छता ।
पालिता निगृहीता च श्रीः स्त्रीभवति भारत॥१३॥४६।१५ स्त्रिया म्हणजे खरोखर मूर्तिमंत लक्ष्मीच होत; कल्याणेच्छु पुरुषाने त्यांचा गौरव करावा. उत्तम प्रकारे पालनपोषण करून योग्य दाबांत ठेविल्याने स्त्री ही [गृह-] लक्ष्मी होते. .९२२ श्रियं ह्यविनयो हन्ति जरा रूपमिवोत्तमम् ॥ ५॥३४॥१२
वार्धक्याने जसा सुंदर रूपाचा, तसा अहंकाराने ऐश्वर्याचा नाश होतो. ९२३ श्रियो बलममात्यांश्च बलवानिह विन्दति ।
यो ह्यनाढ्यः स पतितस्तदुच्छिष्टं यदल्पकम् ॥१२॥१३४।४ ऐश्वर्य, सामर्थ्य, आणि अमात्य हे सर्व बलसंपन्न असलेल्याला प्राप्त होते. जो बलसंपन्न नसेल तो खरोखर पतित होय. अल्पशी सत्ता असणे हे केवळ उच्छिष्टच होय. ९२४ श्रीमन्तं ज्ञातिमासाद्य यो ज्ञातिरवसीदति ।
दिग्धहस्तं मृग इव स एनस्तस्य विन्दति ॥ ५॥३९।२७ विषाने माखलेला बाण हातामध्ये घेऊन मृगहत्त्या करणाराला मृगहत्त्येचे पातक लागते, त्याप्रमाणे आपल्या कुलामध्ये श्रीमंत पुरुष असतांना जे ज्ञातिजन निकृष्ट दशेस पोचतात, त्यांचे पातक त्या श्रीमान् पुरुषाला प्राप्त होते.
For Private And Personal Use Only