Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
९११ शूरः सर्वं पालयति सर्वं शूरे प्रतिष्ठितम् ।। १२।९९।१८ . शूर पुरुष सर्वांचे रक्षण करतो. शूराच्या आधाराने सर्व राहतात. ९१२ शूरा वीराश्च शतशः सन्ति लोके युधिष्ठिर ।
येषां सख्यायमानानां दानशूरो विशिष्यते ॥१३।८।११ ( भीष्म म्हणतात.) हे युधिष्ठिरा, शूर वीर जगांत शेकड्यांनी आहेत. पण त्यांची मोजदाद करूं म्हटलं, तर दानशूर हाच विशेष श्रेष्ठ ठरेल. ९१३ शगालोऽपि वने कर्ण शशैः परिवृतो वसन् ।
__ मन्यते सिंहमात्मानं यावत्सिहं न पश्यति ॥ ८।३९।२८ [ शल्य म्हणतो ] हे कर्णा, वनांत सशांच्या जमावांत बसला असतां कोल्ह्याला सुद्धा आपण सिंह आहो असे वाटते. [पण कोठवर ? ] सिंह दृष्टीस पडला नाही तोवर. ९१४ शृणु यक्ष कुलं तात न स्वाध्यायो न च श्रुतम् ।
कारणं हि द्विजत्वे च वृत्तमेव न संशयः॥३॥३१३।१०८ [युधिष्ठिर म्हणतो. ] बा यक्षा, ऐक. द्विजत्वाला कारण कुल नव्हे, वेदपठण नव्हे, किंवा शास्त्राभ्यासहि नव्हे, तर शील हेच द्विजत्वाला कारण होय यांत संशय नाही. ९१५ शोकः कार्यविनाशनः ॥ ७/८०७
शोकाने कार्यनाश होतो. ९१६ शोककाले शुचो मा त्वं हर्षकाले च मा हषः ।
अतीतानागतं हित्वा प्रत्युत्पन्नेन वर्तय ॥ १२॥२२७/६६ [ बलि इंद्राला म्हणतो. ] दुःखाच्या वेळी तूं दुःख करूं नको आणि आनंदाच्या वेळी हर्ष मानूं नको. पूर्वी होऊन गेलेले आणि पुढे होणारे यांचा विचार करीत न बसतां वर्तमानकाळाकडे नजर देऊन वाग. ९१७ शोकस्थानसहस्राणि भयस्थानशतानि च ।
दिवसे दिवसे मूढमाविशन्ति न पण्डितम् ।। १।२।२२ . रोजच्यारोज हजारों शोक करण्याजोग्या गोष्टी आणि शेंकडों भय वाटण्याजोग्या गोष्टी मूढाला प्राप्त होत असतात, शहाण्याला प्राप्त होत नाहीत.
For Private And Personal Use Only