Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१४२
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
८८६ व्यवसायं समाश्रित्य सहायान् योऽधिगच्छति ।
न तस्य कश्चिदारम्भः कदाचिदवसीदति ॥१२।२९८१४२ जो आपली मुख्य भिस्त स्वतःचे प्रयत्नावर ठेवून मग दुसऱ्यांचे साहाय्य घेतो, त्याचा कसलाहि प्रयत्न केव्हांहि फसत नाही. ८८७ बजे वाप्यथवारण्ये यत्र सन्ति बहुश्रुताः !
तत्तनगरमित्याहुः पार्थ तीर्थ च तद्भवेत् ॥ ३२००९२ (मार्कंडेय म्हणतात ) हे युधिष्टिरा, बहुश्रुत ब्राह्मण जेथे असतील तो गौळवाडा असला, अथवा अरण्य जरी असले तरी त्यालाच नगर म्हणतात, आणि तेच तीर्थ होते. ८८८ शकुनानामिवाकाशे मत्स्यानामिव चोदके ।
पदं यथा न दृश्येत तथा पुण्यकृतां गतिः॥१२॥३२२।१९ पक्ष्यांनी आकाशांत आणि माशांनी पाण्यांत आक्रमिलेल्या मार्गाची जशी काही खूग दिसत नाही, त्याप्रमाणे पुण्यवान् लोकांना प्राप्त होणारी गति उघड दिसत नाही. ८८९ शक्नोति जीवितुं दक्षो नालसः सुखमेधते ॥ १०॥२।१५ ___ तत्परतेने उद्योग करणारा मनुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतो. आळशी मनुष्याला मुख म्हणून मिळत नाही. ८९० शक्नोतीहैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् ।
कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः ॥६।२९।२३ शरीर टाकून देण्यापूर्वी या जगांत असतांनाच, जो कामक्रोधांचा तडाका सहन करूं शकतो तो योगी होय. तोच मनुष्य सुखी होतो. ८९१ शक्यं ह्येवाहवे योद्धं न दातुमनसूयितम् ॥ १३॥८।१०
समरांगणांत लढणे सहज शक्य आहे; पण असूया [ म्हणजे हेवा, लोभ वगैरे ] न धरितां दान करणे हे मात्र शक्य नाही. ८९२ शत्रुः प्रवृद्धो नोपेक्ष्यो दुबैलोऽपि बलीयसा ॥ ५।९।२२
शत्रु दुर्बळ जरी असला तरी तो वृद्धिंगत झाला असतां, बलाढ्य पुरुषानेहि त्याची उपेक्षा करितां उपयोगी नाही.
For Private And Personal Use Only