Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
८७९ वृत्तं यत्नेन संरक्षेद्वित्तमेति च याति च। _अक्षीणो वित्ततः क्षीणो वृत्ततस्तु हतो हतः ५/३६।३७
शीलाचे यत्नपूर्वक रक्षण करावे. द्रव्य काय, मिळते आणि जातें, जो केवळ द्रव्याने क्षीण झाला तो खरोखर क्षीण नव्हे, पण ज्याचे शील भ्रष्ट झाले त्याचा सर्वस्वी नाश झाला. ८८० वृत्तेः कार्पण्यलब्धाया अप्रतिष्ठैव ज्यायसी ॥५।९०७४ मिंधेपणाने उपजीविका करण्यापेक्षा अगदी निराधार असणेच चांगलें. ८८१ वृत्तेन हि भवत्यार्यो न धनेन न विद्यया ॥५९०५३
शीलाच मनुष्य आर्य गणला जातो; धनाने नव्हे, अथवा विद्येनेंहि नव्हे. ८८२ वेदाच्या वृत्तसंपन्ना ज्ञानवन्तस्तपस्विनः। __यत्र तिष्ठन्ति वै विप्रास्तन्नाम नगरं नृप ॥ ३२००९१
(मार्कंडेय युधिष्ठिराला म्हणतात ) हे राजा, वेदपारंगत, शीलसंपन्न, ज्ञानी व तपस्वी असे ब्राह्मण ज्यांत राहात असतील त्यालाच खरोखर नगर म्हणावें. ८८३ वेदाऽहं तव या बुद्धिरानृशंस्याऽगुणैव सा ॥१२।७५।१८
[धर्माचरण करण्याच्या इच्छेने राज्य सोडून अरण्यांत जाऊ इच्छिणाऱ्या युधिष्ठिरास भीष्म म्हणतात ] तुझ्या बुद्धीला क्रूरत्वाचा संपर्क नाही हे मी जाणून आहे पण तशा प्रकारची बुद्धि निष्फल होय. ८८४ वैद्याश्चाप्यातुराः सन्ति बलवन्तश्च दुर्बलाः ।
श्रीमन्तश्चापरे घण्टा विचित्रः कालपर्ययः॥ १२२८।२२ वैद्यांनासुद्धा रोग होतात. आणि बलवान् देखील दुबळे ठरतात. तसेंच कित्येक श्रीमंत लोक नामर्द असतात. ही काळाचीच विचित्र गति आहे. ८८५ व्यक्तं हि जीर्यमाणोऽपि बुद्धिं जरयते नरः॥७।१४३।१६
मनुष्य वृद्ध होऊ लागला म्हणजे त्याची बुद्धिहि त्याच्या शरीराबरोबरच जीर्ण होऊ लागते हे अगदी खरे आहे.
For Private And Personal Use Only