Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१३९
-
~
~
~
८६८ विवाहकाले रतिसंप्रयोगे
प्राणात्यये सर्वधनापहारे ।। विप्रस्य चार्थे ह्यनृतं वदेत
पञ्चानृतान्याहुरपातकानि ॥ ८॥६९।३३ विवाहकाली, संभोगसमयीं, प्राणसंकट ओढवले असतां, सर्वस्वाचा नाश होण्याचा समय आला असता, तसेंच एकाद्या ब्राह्मणाचे हित साधत असेल तर मनुष्याने असत्य भाषण केले तरी चालेल. या पांच प्रसंगी असत्य भाषणाच्या योगाने पातक लागत नाही. ८६९ विश्वासयित्वा तु परं तत्त्वभूतेन हेतुना । ___ अथास्य प्रहरेकाले किंचिद्विचलिते पदे ॥१२॥१४०४४
खरेखुरे कारण दाखवून शत्रूचा विश्वास संपादन करावा. आणि कालांतराने त्याचें आसन जरासें डळमळीत झाले की, त्याच्यावर प्रहार करावा. ८७० विश्वासयेत्परांश्चैव विश्वसेच न कस्यचित् ।
पुत्रेष्वपि हि राजेन्द्र विश्वासो न प्रशस्यते ॥ १२॥८५।३३ ( भीष्म युधिष्ठिराला म्हणतात ) दुसऱ्यांचा विश्वास संपादन करावा. पण आपण मात्र कोणावरहि विश्वास ठेवू नये. राजा, फार काय, पण पोटच्या मुलाचासुद्धां पूर्ण विश्वास धरणे प्रशस्त नव्हे. ८७१ विश्वासाद्भयमभ्येति नापरीक्ष्य च विश्वसेत् १२।१४०४३
[ भलत्याच मनुष्यावर ] विश्वास टाकिल्याने भीति उत्पन्न होत असते. यास्तव, परीक्षा पाहिल्यावांचून कोणावरहि विश्वास ठेवू नये. ८७२ विषमं न हि मन्यन्ते प्रपातं मधुदर्शिनः ॥ ५॥५१२६
मध पाहणारे [ मधाच्या ठिकाणाचा ] तुटलेला कडा किती भयंकर आहे इकडे. लक्ष देत नाहीत. ८७३ विषमां च दशां प्राप्तो देवान् गर्हति वै भृशम् ।
आत्मनः कर्मदोषाणि न विजानात्यपण्डितः॥३२०९।६. मूर्ख मनुष्य दुर्दशेच्या फेऱ्यांत सांपडला म्हणजे देवांच्या नांवानें खडे फोडतो,. पण आपले चुकते कोठे, हे त्याला समजत नाही...
For Private And Personal Use Only