Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१३७
८५५ वाग्वज्रा ब्राह्मणाः प्रोक्ताः
क्षत्रिया बाहुजीविनः ॥ १२॥१९९।४६ वाणी हे ब्राह्मणांचे शस्त्र असून क्षत्रिय हे बाहुबलावर जगणारे होत असें म्हटले आहे. ८५६ वाचा भृशं विनीतः स्यादयेन तथा क्षुरः।
स्मितपूर्वाभिभाषी स्यात्सृष्टो रौद्रेण कर्मणा ।। १।१४०६६ बोलण्यांत अगदी विनयशील पण हृदयाने कठोर असावे. स्मितपूर्वक बोलावें परंतु आपले खरे स्वरूप भयंकर कृति करून प्रगट करावे. ८५७ वासांसि जीर्णानि यथा विहाय
_ नवानि गृह्णाति नरोऽपराणि । तथा शरीराणि विहाय जीर्णा
न्यन्यानि संयाति नवानि देही ॥ ६२६।२२ ज्याप्रमाणे मनुष्य जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी घेतो, त्याप्रमाणे आत्मा हा जीर्ण झालेली शरीरें टाकून देऊन दुसऱ्या नव्या शरीरांत प्रवेश करतो. ८५८ विक्रमाधिगता ह्याः क्षत्रधर्मेण जीवतः ।
मनो मनुष्यस्य सदा प्रीणन्ति पुरुषोत्तम ॥ ५।९०७९ ( कुंती श्रीकृष्णाला म्हणते ) हे पुरुषोत्तमा, पराक्रम करून मिळविलेले द्रव्य क्षात्रधर्माने चालणाऱ्या मनुष्याच्या मनाला सदा संतोष देते. ८५९ विगुणा ह्यपि संरक्ष्या ज्ञातयो भरतर्षभ ॥ ५॥३९।२०
(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो ) हे भरतश्रेष्ठा, आपल्या कुलांतील गुणहीन पुरुषांचेंहि संरक्षण करणे अवश्य आहे. ८६० विजयो मन्त्रमूलो हि राज्ञो भवति भारत ॥२२५२७
( नारद युधिष्ठिराला म्हणतात. ) राजाला विजय प्राप्त होण्याला मूळ कारण गुप्त सल्लामसलत हेच होय.
For Private And Personal Use Only