Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
८४१ लोको ह्यार्यगुणानेव भूयिष्ठं तु प्रशंसति ॥ १३॥१२२।२
लोक चांगल्या गुणांचीच अतिशय प्रशंसा करीत असतात. ८४२ लोभं हित्वा सुखी भवेत् ॥ ३॥३१३१७८
लोभ टाकिल्यानें मनुष्य सुखी होतो. ८४३ लोभात्पापं प्रवर्तते ॥ १२॥१५८१२
लोभापासून पातकाची प्रवृत्ति होते. ८४४ लोहितोदा केशतणां गजशैलां ध्वजद्रमाम ।
महीं करोति युद्धेषु क्षत्रियो यः स धर्मवित्॥१२॥५५॥१८ जो संग्रामामध्ये पृथ्वीला रक्तरूपी जलाने युक्त, केशरूपी तृणाने आच्छादित झालेली, गजरूपी पर्वत असलेली व ध्वजरूपी वृक्षांनी युक्त अशी करितो, तोच क्षत्रिय खरा धर्म वेत्ता होय. ८४५ वधमेव प्रशंसन्ति शत्रूणामपकारिणाम् ॥१११४०।१० ___ अपकार करणाऱ्या शत्रूचा वधच करणे प्रशस्त मानतात. ८४६ वध्यन्ते न ह्यविश्वस्ताः शत्रुभिर्दुर्बला अपि ।।
विश्वस्तास्तेषु वध्यन्ते बलवन्तोऽपि दुर्बलैः १२।१३८।१९८ जे सावध असतात ते दुर्बळ असले तरी शत्रूकडून मारिले जात नाहीत. पण बलाढ्य असले तरी शत्रूविषयी बेसावध राहणारे, दुर्बळ शत्रूकडूनहि मारिले जातात. ८४७ वर्तमानः सुखे सर्वो मुह्यतीति मतिर्मम ॥३॥१८॥३०
( अजगर झालेला नहुष राजा युधिष्ठिराला म्हणतो.) सुखांत असतां सर्वांना मोह उत्पन्न होतो असे माझे मत आहे. ८४८ वर्धमानमृणं तिष्ठेत्परिभूताश्च शत्रवः ।
__ जनयन्ति भयं तीव्र व्याधयश्चाप्युपेक्षिताः॥१२॥१४०५९ ___ ऋण अवशिष्ट राहिले तर तें वृद्धिंगतच होत जाते. शत्रु शिल्लक ठेविले तर त्यांचा अपमान झाल्यामुळे ते पुढे अत्यंत भीति उत्पन्न करितात. आणि रोगांची उपेक्षा केली तर त्यापासूनहि अतिशय भीति उत्पन्न होते.
For Private And Personal Use Only