Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१३४
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
anAAAAAI
८३४ राज्यं हि सुमहत्तन्त्र धार्यते नाकृतात्मभिः ।
न शक्यं मृदुना वोटुमायासस्थानमुत्तमम् ॥ १२॥५८।२१ राज्य चालविणे हे अत्यंत अवघड काम आहे. ज्याने आपल्या बुद्धीला विशिष्ट प्रकारचे वळण लावलेले नाही, त्याला तें झेंपणार नाही. राज्यधुरा वाहणे हे अत्यंत कष्टप्रद असून ते लेच्यापेच्या मनुष्याला शक्य नाही. ८३५ राज्यं प्रणिधिमूलं हि मन्त्रसारं प्रचक्षते ॥ १२॥८३१५१
हेर हा राज्याचा आधार, आणि सल्लामसलत ही शक्ति होय असे म्हणतात. ८३६ राष्ट्रस्यैतत्कृत्यतमं राज्ञ एवाभिषेचनम् ।
अनिन्द्रमबलं राष्ट्र दस्यवोऽभिभवन्त्युत ॥ १२॥६७।२ कोणत्यातरी राजाला राज्याभिषेक करणे हे एक राष्ट्राचे प्रमुख कर्तव्य आहे. कारण राष्ट्राला कोणी नियंता नसला म्हणजे ते दुर्बळ झाल्यामुळे शत्रु त्याच्यावर हल्ला करतात. ८३७ रोहते सायकैर्विद्धं वनं परशुना हतम् ।
वाचा दुरुक्तं बीभत्सं न संरोहति वाक्क्षतम् ।।५।३४१७८ बाणांनी वेधलेले अथवा कुन्हाडीने तोडलेलें वन फिरून वाढीस लागते. परंतु दुष्ट व बीभत्स बोलण्याने पडलेली जखम भरून येत नाही. ८३८ लोकयात्रार्थमेवेह धर्मस्य नियमः कृतः ॥ १२।२५९।५ : लोकव्यवहार सुरळीतपणे चालावा एवढ्यासाठीच धर्माचरणाचा नियम घालून दिला आहे. ८३९ लोकरञ्जनमेवात्र राज्ञां धर्मः सनातनः ॥१२॥५७।११
या लोकी प्रजेला सुखी ठेवणे हाच राजांचा सनातन धर्म आहे. ८४० लोकसत्ताद्राजवृत्तमन्यदाह बृहस्पतिः ॥२।५५।६।। प्रजेच्या कर्तव्याहून राजाचे कर्तव्य निराळे असल्याचे बृहस्पतीने प्रतिपादिले आहे.
For Private And Personal Use Only