Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१३२
सार्थश्रीमहाभारतसभाषितानि
vvvvvvvvvvvvvvvv
८२१ रथः शरीरं भूतानां सत्त्वमाहुस्तु सारथिम् ।
इन्द्रियाणि हयानाहुः कर्मबुद्धिस्तु रश्मयः ॥११७१३ जीवाचें शरीर हा रथ व बुद्धि हा सारथि होय. इंद्रिये हे [ या रथाला जोडलेले । घोडे होत. आणि मन हा लगाम होय. ८२२ राजन्सर्षपमात्राणि परच्छिद्राणि पश्यसि ।
आत्मनो बिल्बमात्राणि पश्यन्नपि न पश्यसि ॥११७४१८२ ( शकुंतला दुष्यंताला म्हणते ) राजा, दुसऱ्यांचे मोहरीएवढे बारीक दोष तुला दिसतात, पण स्वतःचे बेलफळा एवढे मोठे दोषहि तूं पहात असूनहि तिकडे. डोळेझांक करतोस. ८२३ राजमूला महाबाहो योगक्षेमसुदृष्टयः ।
प्रजासु व्याधयश्चैव मरणं च भयानि च ॥१२॥१४११९ (भीष्म युधिष्ठिराला म्हणतात ) प्रजेचा योगक्षेम नीट चालणे, पर्जन्य चांगला पडणे, तसेंच प्रजेला रोग, मरण अथवा भय प्राप्त होणे या सर्वांचे मुख्य कारण राजाच आहे. ८२४ राजमूलो महाप्राज्ञ धर्मो लोकस्य लक्ष्यते ।
प्रजा राजभयादेव न खादन्ति परस्परम् ॥ १२॥६८८ ( बृहस्पति वसुमना राजाला सांगतात) लोक धर्माने वागतात याचे कारण राजाच होय असे दिसून येते. राजाच्या भीतीमुळेच लोक एकमेकांना खाऊन टाकीत नाहीत. ८२५ राजा कृतयुगस्रष्टा त्रेताया द्वापरस्य च ।
युगस्य च चतुर्थस्य राजा भवति कारणम् ॥१२॥६९/९८ जगांत कृतयुग उत्पन्न करणारा राजाच होय. तीच गोष्ट त्रेतायुगाची व द्वापर युगाची आणि चौथ्या म्हणजे कलियुगालाहि राजाच कारण होतो. ८२६ राजा चेन भवेल्लोके पृथिव्यां दण्डधारकः ।
जले मत्स्यानिवाभक्ष्यन्दुबैलं बलवत्तराः ॥ १२॥६७१६ पृथ्वीवर दंड धारण करणारा राजा जर नसता, तर पाण्यातील माशांप्रमाणे बलवत्तर लोकांनी दुर्बळांना खाऊन टाकलें असतें.
For Private And Personal Use Only