Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
८१४ यो यथा वर्तते यस्मिंस्तस्मिन्नेव प्रवर्तयन् ।
नाधर्म समवानोति नचाश्रेयश्च विन्दति ॥५।१७८।५३ जो ज्याच्याशी ज्याप्रकारे वागतो त्याच्याशी त्या प्रकारे वागण्यांत कोणताहि अधर्म घडत नाही, आणि त्यापासून अकल्याणहि होत नाही. ८१५ यो यस्मिञ्जीवति स्वार्थे पश्येत्पीडां न जीवति ।
स तस्य मित्रंतावत्स्याद्यावन्नस्याद्विपर्ययः।।१२।१३८।१४० जो जिवंत राहिला असतां स्वार्थाला बाध येणार नाही व आपले प्राण वाचतील असें ज्याला वाटत असेल त्याचा तो मित्र, उलट स्थिति आली नाही तोवरच असतो. ८१६ योऽरिणा सह संधाय सुखं स्वपिति विश्वसन् ।
स वृक्षाग्रे प्रसुप्तो वा पतितः प्रतिबुध्यते ॥ १२॥१४०।३७ जो शत्रूशी तह केल्यावर त्याच्यावर विश्वास ठेवून खुशाल झोपा काढतो तो, झाडाच्या शेंड्यावर झोपी गेलेल्या मनुष्याप्रमाणे, पडल्यावरच जागा होतो. ८१७ यो विद्यया तपसा संप्रद्धः
स एव पूज्यो भवति द्विजानाम् ॥ १।८९।३ जो विद्येने व तपाने वृद्ध झाला तोच द्विजांना पूज्य वाटतो. ८१८ यो वै संतापयति यं स शत्रुः प्रोच्यते नृप ॥२।५५।१०
( दुर्योधन धृतराष्ट्राला सांगतो ) हे राजा, जो ज्याला पीडा करतो तो त्याचा शत्रु समजला जातो. ८१९ यो हि तेजो यथाशक्ति न दर्शयति विक्रमात ।
क्षत्रियो जीविताकाङ्क्षी स्तेन इत्येव तं विदुः।।५।१३४।२ जिवाच्या आशेने जो क्षत्रिय यथाशक्ति पराक्रम करून आपलें तेज प्रकट करीत नाहीं तो चोरच म्हटला पाहिजे ! | ८२० रक्षणं सर्वभूतानामिति क्षात्रं परं मतम् ॥१२॥१२०१३
सर्व भूतांचे रक्षण करणे हाच क्षत्रियाचा परम धर्म होय.
For Private And Personal Use Only