Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१४०
सार्थ श्रीमहाभारत सुभाषितानि
८७४ विषमावस्थिते दैवे पौरुषेऽफलतां गते
विषादयन्ति नात्मानं सत्त्वोपाश्रयिणो नराः || ३|७९।१४
दैव प्रतिकूळ होऊन प्रयत्न फुकट गेला असतां, सत्वशील पुरुष अंतःकरण खिन्न होऊ देत नाहींत.
८७५ विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः ।
रसवर्ज रसोऽप्यस्य परं दृष्टा निवर्तते ।। ६ । २६ । ५९
निराहारी पुरुषाला विषय सोडून जातात, पण त्यांची आवड शिल्लक राहतेच, ही आवडसुद्धां परब्रह्माचा साक्षात्कार झाल्यानंतर नष्ट होते.
८७६ विष्वग्लोपः प्रवर्तेत भिद्येरन्सर्व सेतवः ।
ममत्वं न प्रजानीयुर्यदि दण्डो न पालयेत् ।। १२।१५ ३८
दंडाने जर संरक्षण केलें नसतें तर चोहोंकडे शून्य होऊन गेलें असतें; सर्व प्रकारच्या मर्यादांचा भंग होऊन गेला असता; आणि कोणाची कशावर मालकी • राहिली नसती.
८७७ विहीनं कर्मणाऽन्यायं यः प्रगृह्णाति भूमिपः ।
उपायस्याविशेषज्ञं तद्वै क्षत्रं नपुंसकम् || १२ | १४२/३१ सामादिक उपाय व त्यांचे भेद यांचे ज्ञान नसणारा जो राजा, अन्यायानें प्रजेकडून कर वसूल करतो; पण आपलें प्रजापालनरूप कर्तव्य मात्र करीत नाहीं तो क्षत्रिय केवळ नपुंसक होय.
८७८ वृक्षमूलेऽपि दयिता
यस्य तिष्ठति तद्गृहम् |
प्रासादोऽपि तया हीनः
कान्तार इति निश्चितम् ।। १२।१४४।१२
कोणी झाडाखाली राहिला, तरी त्याची स्त्री बरोबर असेल, तर तें त्याचें घरच होय, आणि तिजवांचून जरी एकादें राजमंदिर असले तरी तें निःसंशय अरण्यच होय.
For Private And Personal Use Only