Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
८८
सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि
५४९ नित्यं यस्तु सतो रक्षेदसतश्च निवर्तयेत् ।
स एव राजा कर्तव्यस्तेन सर्वमिदं धृतम् || १२|७८|४४ जो नेहमीं सज्जनांचें पालन करील आणि दुर्जनांना घालवून देईल त्यालाच राजा करावे. त्याच्याच आश्रयानें सर्व विश्व असतें.
५५० नित्यं रक्षितमन्त्रः स्याद्यथा मूकः शरच्छिखी ।। १२।१२०/७ ज्याप्रमाणे मोर हा शरहतूंत मौन धारण करतो, त्याप्रमाणें राजानें आपली मसलत नेहमीं गुप्त राखावी.
५५१ नित्यं विश्वासयेदन्यान् ।
परेषां तु न विश्वसेत् ।। १२।१३८।१९५
आपल्याविषयीं दुसऱ्यांच्या मनांत नेहमीं विश्वास उत्पन्न करावा. आपण मात्र दुसऱ्यांवर विश्वास ठेवू नये.
५५२ नित्यमुद्यतदण्डस्य भृशमुद्विजते नरः ।
तस्मात्सर्वाणि भूतानि दण्डेनैव प्रसाधयेत् || १२ | १४०१८ दंडशक्ति नेहमीं सज्ज असली म्हणजे लोक फार वचकून असतात. यास्तव राजानें सर्व प्राण्यांना दंडशक्तीच्या योगानेंच आपल्या ताब्यांत ठेवावे. ५५३ नित्यं बुद्धिमतोऽप्यर्थः स्वल्पकोऽपि विवर्धते ।
दाक्ष्येण कुर्वतः कर्म संयमात्प्रतितिष्ठति ।। १२ । १३९।८८
बुद्धिमान् पुरुषाजवळ आरंभीं अगदी थोडे द्रव्य असले तरी तें नेहमीं वाढत जातें. दक्षतेनें, एकाग्रतेनें उद्योग करणाराचे कार्य पक्के होतें.
५५४ निमेषमात्रमपि हि वयो गच्छन्न तिष्ठति ।
स्वशरीरेष्वनित्येषु नित्यं किमनुचिन्तयेत् ॥ १२।३३०/२२
आयुष्य एकसारखें चाललें असून एक पळभरसुद्धां थांबत नाहीं. स्वतःचें शरीरच जेथें अशाश्वत, तेथें कोणती वस्तु शाश्वत म्हणून समजावयाची ? ५५५ नियन्ता चेन्न विद्येत न कश्चिद्धर्ममाचरेत् ||४|६८।४५ नियमन करणारा कोणी नसेल तर कोणीहि धर्माप्रमाणें वागणार नाहीं..
For Private And Personal Use Only