Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
११
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
६८५ मानं हित्वा प्रियो भवति ॥ ३३१३१७८
अभिमान सोडल्याने मनुष्य [ लोकांना ] प्रिय होतो. ६८६ मायया निर्जिता देवैरसुरा इति नः श्रुतम् ॥ ९१५८।५
( श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात. ) कपटाच्या योगानेच देवांनी असुरांना जिंकलें, असे आम्ही ऐकले आहे. ६८७ मायावी मायया वध्यः सत्यमेतद्युधिष्ठिर ॥ ९॥३१७
(श्रीकृष्ण म्हणतात.) हे युधिष्ठिरा, कपटी मनुष्याचा कपटानेच वध केला पाहिजे हे सत्य होय. ६८८ मास्तं गमस्त्वं कृपणो विश्रूयस्व स्वकर्मणा ।
___ मा मध्ये मा जघन्ये त्वं माधोभूस्तिष्ठ गर्जितः।।५।१३३।१३ [विदुला संजयास म्हणते ] तूं दीन होऊन स्वतःचा नाश करून घेऊ नको. स्वपराक्रमाने प्रसिद्धीस ये. तूं मध्यम स्थितीत अथवा हीन स्थितीत राहूं नको. हीन न होतां [ कर्तृत्वानें ] गाजत रहा. ६८९ मित्रं च शत्रतामेति कस्मिंश्चित्कालपर्यये।
शत्रुश्च मित्रतामेति स्वार्थो हि बलवत्तरः॥१२॥१३८।१४२ एकादे वेळेस मित्र वैर करू लागतो आणि शत्रु मित्र बनतो. कारण, स्वार्थ हा फार प्रबळ आहे. ६९० मुहूर्त ज्वलितं श्रेयो न च धूमायितं चिरम् ।।५।१३३३१५
थोडा वेळ का होईना पण चमकून जाणे चांगले; परंतु चिरकाल धुमसत राहणे बरे नव्हे. ६९१ मूल् हि जल्पतां पुंसां श्रुत्वा वाचः शुभाशुभाः।
__ अशुभं वाक्यमादत्ते पुरीषमिव सूकरः ॥ ११७४।९० बोलणा-या लोकांचे बरे वाईट बोलणे ऐकून, त्यांतून वाईट बोलणे तेवढें, विटा प्रहण करणाऱ्या डुकराप्रमाणे, मूर्ख मनुष्य घेत असतो.
For Private And Personal Use Only