Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१२४
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
७७१ यस्मिन्यथा वर्तते यो मनुष्य
स्तस्मिंस्तथा वर्तितव्यं स धर्मः। मायाचारो मायया वर्तितव्यः
साध्वाचारः साधुना प्रत्युपेयः ॥ ५।३७७ ___ ज्याच्याशी जो मनुष्य ज्या प्रकारे वागतो, त्याच्याशी त्याने त्याचप्रकारे वागावें. असे करण्यांतच धर्म आहे. कपट करणाराशी कपटाने वागावे, आणि सरळपणाने चालणाराशी सरळपणा ठेवावा. ७७२ यस्मै देवाः प्रयच्छन्ति पुरुषाय पराभवम् । __बुद्धिं तस्यापकर्षन्ति सोऽवाचीनानि पश्यति ॥ ५/३४१८१
देवांच्या मनांतून ज्याचा नाश करावयाचा असतो, त्याची बुद्धि ते हिरावून घेतात, आणि मग त्याला प्रतिकूल असलेल्या गोष्टी घडून आलेल्या दिसतात. ७७३ यस्य कृत्यं न जानन्ति मन्त्रं वा मन्त्रित परे ।
कृतमेवास्य जानन्ति स वै पण्डित उच्यते ॥ ५॥३३॥१८ पुढे करावयाचे ज्याचे कृत्य अथवा योजलेला बेत दुसऱ्यांना कळत नाही, काय तें प्रत्यक्ष कृतीत आल्यावरच समजते त्याला पंडित म्हणतात. ७७४ यस्य दानजितं मित्रं शत्रवो युधि निर्जिताः । ___ अन्नपानजिता दाराः सफलं तस्य जीवितम् ।। ५।३९८३ ज्याने उदारपणाने मित्र आपलासा केला, युद्ध करून शत्रूना जिंकले आणि अन्नपानादिकांच्या योगाने स्त्रीला स्वाधीन ठेवले त्याचें जीवित सफल झाले. ७७५ यस्य धर्मो हि धर्मार्थः क्लेशभाङ् न स पण्डितः ।
न स धर्मस्य वेदार्थ सूर्यस्यान्धः प्रभामिव ॥ ३।३३।२३ [ तत्त्व न जाणतां ] केवळ धर्मासाठी जो धर्माचरण करतो तो शहाणा नसून दुःखाचा मात्र वांटेकरी होणारा असतो. अंधळ्याला ज्याप्रमाणे सूर्याची प्रभा समजत नाही, त्याप्रमाणे त्याला धर्माचा अर्थ समजत नाही.
For Private And Personal Use Only