Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१२७
७८८ यादृशं वपते बीजं क्षेत्रमासाद्य कर्षकः।
सुकृते दुष्कृते वापि तादृशं लभते फलम् ॥१३।६।६ शेतकरी शेतांत ज्या प्रकारचे बीज टाकतो त्या प्रकारचे त्यास फळ मिळते. जर याने चांगले बी पेरले तर त्यास चांगले फळ येते; आणि वाईट पेरिलें तर वाईट फळ येते. ७८९ यादृशः पुरुषस्यात्मा तादृशं संप्रभाषते ॥ ५।३।१
पुरुषाचे अंतःकरण जशा प्रकारचे असते तशा प्रकारचे तो भाषण करीत असतो. ७९० यादृशैः संनिविशते यादृशांश्चोपसेवते ।
यादृगिच्छेच्च भवितुं तादृग्भवति पूरुषः॥ ५।३६।१३ कोणी मनुष्य ज्या प्रकारच्या लोकांशी सहवास ठेवितो, ज्या प्रकारच्या मनुष्यांची सेवा करतो, आणि ज्या प्रकारचा होण्याची इच्छा धरतो त्या प्रकारचा तो होतो. ७९१ यादृशो जायते राजातादृशोऽस्य जनो भवेत् ।।११।८।३२
जसा राजा असेल तशी त्याची प्रजा होते. ७९२ यावच्च मार्दवेनैतान् राजन्नुपचरिष्यसि ।
तावदेते हरिष्यन्ति तव राज्यमरिंदम ॥ ५/७३।८ [श्रीकृष्ण युधिष्ठिरास म्हणतात ] हे शत्रूचे दमन करणाऱ्या धर्मराजा, जोपर्यंत तूं सामोपचाराने यांच्याशी [ म्हणजे कौरवांशी ] वागत राहाशील तोपर्यंत हे तुझे राज्य बळकावून बसतील. ७९३ यावत्कीर्तिमनुष्यस्य न प्रणश्यति कौरव ।
तावज्जीवति गान्धारे नष्टकीर्तिस्तु नश्यति ॥१॥२०३।११ (भीष्म म्हणतात ) गांधारीपुत्रा दुर्योधना; जोपर्यंत मनुष्याची कीर्ति नष्ट झालेली नाही तोपर्यंत तो जिवंत असतो. कीर्ति नाहीशी झाली म्हणजे त्याचा नाश होतो. ७९४ यावद्धि तीक्ष्णया मूच्या विध्येदग्रेण केशव ।।
तावदप्यपरित्याज्यं भूमेन: पाण्डवान्पति ॥ ५।१२७।२५ (दुर्योधन म्हणतो ) कृष्णा, तीक्ष्ण सुईच्या टोकानें जेवढ्याचा वेध करता येईल तेवढी भूमि देखील आम्ही पांडवांना देणार नाही.
For Private And Personal Use Only