Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१२६ सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि ७८२ यस्यैव बलमोजश्च स धर्मस्य प्रभुर्नरः ॥ १२।१५२।१८
ज्याच्या आंगीं सामर्थ्य आणि तेज ही असतात तोच मनुष्य धर्माचरणास समर्थ होतो. ७८३ यः सदारः स विश्वास्यः ॥ १।७४।४४
जो सपत्नीक असेल त्याच्यावर विश्वास ठेवावा. ७८४ यः सपत्नश्रियं दीप्तां हीनश्रीः पर्युपासते ।
मरणं शोभनं तस्य इति विद्वज्जना विदुः ॥ ११७९।१३ जो स्वतःचे ऐश्वर्य नष्ट झाले असतां प्रतिपक्ष्याच्या डोळे दिपणाऱ्या वैभवाची आराधना करतो, त्याला मृत्यु आलेला फार उत्तम असें ज्ञाते लोक म्हणतात. ७८५ यः समुत्पतितं क्रोधं क्षमयेह निरस्यति । ___ यथोरगस्त्वचं जीर्णा स वै पुरुष उच्यते ॥ ११७९।४
सर्प जसा जीर्ण झालेली त्वचा टाकून देतो त्याप्रमाणे अंतःकरणांत उत्पन्न झालेल्या क्रोधाचें क्षमेच्या योगानें जो निवारण करतो. तोच पुरुष म्हणावयाचा. ७८६ यः सौहृदे पुरुष स्थापयित्वा
पश्चादेनं दूषयते स बालः ॥ २॥६४।१३ जो पहिल्याने आपणच एकाद्याला आपला स्नेही समजतो व मागून त्याला दूषण देतो तो पोरकट होय. ७८७ या दुस्त्यजा दुर्मतिभिर्या न जीयति जीर्यतः ।
योऽसौपाणान्तिकोरोगस्तांतृष्णांत्यजतःसुखम्॥१३।७।२१ दुष्ट मनुष्यांना जिचा त्याग करितां येत नाही, शरीर जीर्ण होत असतां जी कमी होत नाही, जी केवळ प्राणांतीच संपणाऱ्या रोगासारखी आहे त्या तृष्णेचा [ लोभाचा ] त्याग करणारास सुख प्राप्त होतें.
For Private And Personal Use Only