Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१२५
७७६ यस्य नास्ति निजा प्रज्ञा केवलं तु बहुश्रुतः ।
न स जानाति शास्त्रार्थ दर्वी सूपरसानिव ॥ २।५५।१ ज्याला स्वताची बुद्धि नाही पण ज्याने केवळ पुष्कळसें ऐकलेले आहे त्याला, आमटींतल्या पळीला आमटीची चव कळत नाही त्याप्रमाणे शास्त्राचे रहस्य कळत नाही. ७७७ यस्य बुद्धिः परिभवेत्तमतीतेन सान्त्वयेत् ।।
__ अनागतेन दुष्पज्ञं प्रत्युत्पन्नेन पण्डितम् ॥ ११४०७४ ज्याची बुद्धि मंद असेल त्यास आपल्या पूर्वीच्या बढाईच्या गोष्टी सांगाव्या, जो मूर्ख असेल त्यास 'पुढे अमुक करीन' वगैरे आशा लावावी, आणि जो शाहणा असेल त्यास धनादिक देऊन संतुष्ट करावें. ७७८ यस्य भार्या गृहे नास्ति साध्वी च प्रियवादिनी ।
अरण्यं तेन गन्तव्यं यथारण्यं तथा गृहम् ॥१२।१४४।१७ ज्याच्या घरांत सत्त्वशील व प्रिय भाषण करणारी स्त्री नाही, त्याने अरण्यांत निघून जावे. कां की, जसें अरण्य तसेच त्याचें घर. ७७९ यस्य वृत्तं न जल्पन्ति मानवा महदद्भुतम् ।
राशिवर्धनमात्रं स नैव स्त्री न पुनः पुमान् ॥५।१३३।२३ ज्याच्या हातून एकादी मोठी अद्भुत गोष्ट घडल्याचे लोक बोलत नाहीत तो मनुष्य कुचकामाचा, केवळ ! मनुष्यजातीची] संख्या वाढविणारा होय. वस्तुतः त्याला स्त्रीहि म्हणता येत नाही, मग पुरुष तर तो नव्हेच नव्हे. ७८० यस्य स्वल्पं प्रियं लोके ध्रुवं तस्याल्पमप्रियम् ॥५।१३५।१७
जगामध्ये अल्पस्वल्प सत्ता ज्याला प्रिय असते, त्याची ती सत्ता निःसंशय त्याच्या अनर्थालाच कारण होते. ७८१ यस्यास्तस्य मित्राणि यस्यास्तस्य बान्धवाः । ___ यस्यार्थाः स पुमाल्लोके यस्यार्थाः स च पण्डितः।।१२।८।१९
ज्याच्याजवळ द्रव्य असेल त्याच्यासाठी मित्र असतात ज्याच्याजवळ द्रव्य आहे त्याच्याकरितां आप्तेष्ट आहेत. जगांत ज्याच्याजवळ द्रव्य असेल तोच खरा पुरुष आणि तोच पंडित.
For Private And Personal Use Only