Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१२२
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
७५९ यद्यदाचरते राजा तत्प्रजानां स्म रोचते || १२/७५/४
राजा जें जें करतो तें प्रजेला आवडूं लागतें.
७६० यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा । तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोऽशसंभवम् || ६ | ३४ |४१
भगवान् श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात ) जी जी वस्तु मोठेपणा, ऐश्वर्य किंव वैभव यांनी युक्त असेल, ती ती प्रत्येक माझ्या ( परमेश्वराच्या ) तेजाच्या अंशापासून उत्पन्न झालेली आहे असे तूं पक्के समज.
७६१ यद्यपि भ्रातरः क्रुद्धा भार्या वा कारणान्तरे ।
स्वभावतस्ते प्रीयन्ते नेतरः प्रीयते जनः ।। १२।१३८।१५४
कारणपरत्वें भाऊ जरी रागावले किंवा बायको रागावली तरी तीं स्वभावतःच प्रेम करीत असतात. तसें इतर लोक प्रेम करीत नाहींत.
७६२ यन्निमित्तं भवेच्छोकस्तापो वा दुःखमेव च ।
आयासो वा यतो मूलमेकाङ्गमपि तत्त्यजेत् || १२ |१७४|४३ ज्याच्यामुळे शोक, ताप, दुःख किंवा कष्ट होतात, तें कारण जरी आपल्या शरीराचा एक अवयव असले तरीहि त्याचा त्याग केला पाहिजे.
७६३ यमाजीवन्ति पुरुषं सर्वभूतानि संजय ।
पक्कं द्रुममिवासाद्य तस्य जीवितमर्थवत् ।। ५।१३३।४३ ( विदुला म्हणते ) संजया, पक्क वृक्षाप्रमाणे ज्याच्याजवळ गेल्यानें सर्व जीवांचें प्राणरक्षण होतें त्याचेंच जीवित सफल झालें.
७६४ ययोरेव समं वित्तं ययोरेव समं श्रुतम् ।
तयोर्विवाहः सख्यं च न तु पुष्टविपुष्टयोः || १।१३१।१०
ज्यांची श्रीमंती सारखी, ज्यांचे ज्ञान सारखें, त्यांचाच विवाहसंबंध म्हणा किंवा स्नेहसंबंध म्हणा, होत असतो. एक श्रीमंत आणि दुसरा गरीब अशांचा अशा प्रकारचा संबंध कधींहि होत नसतो.
For Private And Personal Use Only