Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१२०
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
७४८ यदिदं ब्रह्मणो रूपं ब्रह्मचर्यमिति स्मृतम् ।
परं तत्सर्वधर्मभ्यस्तेन यान्ति परां गतिम् ॥१२।२१४१७ [ परब्रह्माच्या प्राप्तीचे साधन असल्यामुळे ] ब्रह्मचर्य हे परब्रह्माचें केवळ स्वरूपच आहे असे सांगितले आहे. ते सर्व प्रकारच्या धर्मनियमांपेक्षा श्रेष्ठ आहे. त्याच्या योगानेच अत्यंत श्रेष्ठ गति प्राप्त होते. ( मोक्ष मिळतो.) ७४९ यदि नात्मनि पुत्रेषु न चेत्पौत्रेषु नप्तषु ।
न हि पापं कृतं कर्म सद्यः फलति गौरिव ॥१२।९२१ आपल्या पापकर्माचे प्रायश्चित्त आपल्याला भोगावे लागले नाही तर आपल्या मुलांना, त्यांना नाही तर नातवांना ( तरी भोगावे लागेल ) कारण, गाईला खाणे घातले असतां ती लगेच जास्त दूध देते, त्याप्रमाणे पापकर्माचे फळ ताबडतोब मिळते असे नाही. ( 'गो' म्हणजे भमि असा अर्थ घेऊन या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीचा पुढील प्रमाणे दुसराहि अर्थ टीकाकारांनी केलेला आहे:-' भूमीत धान्य पेरिले की ते लागलेच जसें पिकत नाही, तसेंच केलेल्या पापकर्माचे फळ तत्काळ मिळू शकत नाही.) ७५० यदि नैवंविधं जातु कुर्या जिह्ममहं रणे। ___ कुतो वा विजयो भूयःकुतो राज्यं कुतो धनम् ॥ ९।६११६४
[ श्रीकृष्ण पांडवांस म्हणतात ] युद्धांत [ भीष्मद्रोणादिकांना मारण्याच्या कामी ] अशा प्रकारचे कपट जर मी केले नाही, तर तुम्हांला जय कसा मिळेल ? फिरून राज्य कसे मिळणार ? धन कोठून मिळणार ? ७५१ यदिष्टं तत्सुखं प्राहुढेष्यं दुःखमिहेष्यते ॥ १२।२९५।२७
इहलोकी में इष्ट वाटतें तें सुख, आणि जें द्वेष्य वाटतें तें दुःख असें मानिले जाते. ७५२ यदि संन्यासतः सिद्धिं राजा कश्चिदवाप्नुयात् ।
पर्वताश्च द्रमाश्चैव क्षिप्रं सिद्धिमवाप्नुयुः ॥ १२।१०।२४ संन्यासाने जर एकाद्या राजाला सिद्धि प्राप्त होती तर [ निष्क्रिय अशा ] पर्वतांना व वृक्षांनासुद्धां सिद्धि तत्काळ मिळाली असती !
For Private And Personal Use Only