Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
७५३ यदि स्यात्पुरुषः कर्ता शक्रात्मश्रेयसे ध्रुवम् । । आरम्भास्तस्य सिध्येयुर्न तु जातु पराभवेत् १२ २२२|१८
[ स्थानभ्रष्ट व पाशबद्ध झालेला प्रहाद इंद्राला म्हणतो ] इंद्रा, आत्मकल्याण साधून घेणे ही गोष्ट जर निश्चर्येकरून पुरुषाच्याच हातची असती, तर त्याचे सर्व उद्योग सिद्धीस गेले असते; त्याला केव्हांहि अपयश आलें नसतें. ७५४ यदैव शत्रुर्जानीयात्सपत्नं त्यक्तजीवितम् । तदैवास्मादुद्विजते सर्पाद्वेश्मगतादिव || ५ | १३५/३६
१२१
आपला प्रतिपक्षी जिवावर उदार झाला आहे असे जेव्हां शत्रूला समजून येतें, तेव्हांच त्याला घरांत शिरलेल्या सर्पासारखी त्याची भीति वाटू लागते.
७५५ यद्दुरापं दुरान्नायं दुराधर्षं दुरन्वयम् ।
तत्सर्वं तपसा साध्यं तपो हि दुरतिक्रमम् || १४|५१।१७
जे जे म्हणून असाध्य, अज्ञेय, अत्यंत भयंकर किंवा अत्यंत दुस्तर असें असेल तें सर्व तपानें साध्य होतें, खरोखरच, तपाचें अतिक्रमण करणें अशक्य आहे. ७५६ यद्भूतहितमत्यन्तं तत्सत्यमितिधारणा ॥ ३ ।२०९।४
ज्याच्या योगानें जीवाचें अतिशय कल्याण होतें तेंच सत्य असा सिद्धांत आहे. ७५७ यद्यत्प्रियं यस्य सुखं तदाहु
स्तदेव दुःखं प्रवदन्त्यनिष्टम् ।। १२/२०१।१०
ज्याला जें प्रिय वाटतें त्याला तो सुख म्हणतो, तेंच अप्रिय झालें कीं त्यालाच दुःख म्हणतो.
७५८ यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते || ६ |२७|२१
श्रेष्ठ पुरुष ज्या ज्या प्रकारें वागतो त्या त्या प्रकारेंच इतर लोक वागतात. त्याला जें मान्य होतें, त्याचेंच अनुकरण लोक करीत असतात.
For Private And Personal Use Only