SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 131
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि ७५३ यदि स्यात्पुरुषः कर्ता शक्रात्मश्रेयसे ध्रुवम् । । आरम्भास्तस्य सिध्येयुर्न तु जातु पराभवेत् १२ २२२|१८ [ स्थानभ्रष्ट व पाशबद्ध झालेला प्रहाद इंद्राला म्हणतो ] इंद्रा, आत्मकल्याण साधून घेणे ही गोष्ट जर निश्चर्येकरून पुरुषाच्याच हातची असती, तर त्याचे सर्व उद्योग सिद्धीस गेले असते; त्याला केव्हांहि अपयश आलें नसतें. ७५४ यदैव शत्रुर्जानीयात्सपत्नं त्यक्तजीवितम् । तदैवास्मादुद्विजते सर्पाद्वेश्मगतादिव || ५ | १३५/३६ १२१ आपला प्रतिपक्षी जिवावर उदार झाला आहे असे जेव्हां शत्रूला समजून येतें, तेव्हांच त्याला घरांत शिरलेल्या सर्पासारखी त्याची भीति वाटू लागते. ७५५ यद्दुरापं दुरान्नायं दुराधर्षं दुरन्वयम् । तत्सर्वं तपसा साध्यं तपो हि दुरतिक्रमम् || १४|५१।१७ जे जे म्हणून असाध्य, अज्ञेय, अत्यंत भयंकर किंवा अत्यंत दुस्तर असें असेल तें सर्व तपानें साध्य होतें, खरोखरच, तपाचें अतिक्रमण करणें अशक्य आहे. ७५६ यद्भूतहितमत्यन्तं तत्सत्यमितिधारणा ॥ ३ ।२०९।४ ज्याच्या योगानें जीवाचें अतिशय कल्याण होतें तेंच सत्य असा सिद्धांत आहे. ७५७ यद्यत्प्रियं यस्य सुखं तदाहु स्तदेव दुःखं प्रवदन्त्यनिष्टम् ।। १२/२०१।१० ज्याला जें प्रिय वाटतें त्याला तो सुख म्हणतो, तेंच अप्रिय झालें कीं त्यालाच दुःख म्हणतो. ७५८ यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः । स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते || ६ |२७|२१ श्रेष्ठ पुरुष ज्या ज्या प्रकारें वागतो त्या त्या प्रकारेंच इतर लोक वागतात. त्याला जें मान्य होतें, त्याचेंच अनुकरण लोक करीत असतात. For Private And Personal Use Only
SR No.020660
Book TitleSarth Mahabharat Subhashitani
Original Sutra AuthorN/A
AuthorVishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
PublisherKeshav Bhikhaji Dhavle
Publication Year1930
Total Pages463
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy