Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
७२४ यथा बर्हाणि चित्राणि विभर्ति भुजगाशनः ।
__ तथा बहुविधं राजा रूपं कुर्वीत धर्मवित् ॥ १२॥१२०१४ मोर जशी चित्रविचित्र पिसें धारण करतो, त्याप्रमाणे आपले कर्तव्य ओळखणाऱ्या राजाने [ प्रसंगानुसार ] निरनिराळी रूपें धारण करावी. ७२५ यथा बीजं विना क्षेत्रमुप्तं भवति निष्फलम् ।
तथा पुरुषकारेण विना दैवं न सिध्यति ॥ १३॥६७ शेत तयार न करितां त्यांत बी टाकिल्याने जसें तें वायां जाते, त्याप्रमाणे उद्योग केल्यावांचून नुसत्या दैवाने सिद्धि मिळत नाही. ७२६ यथामति यथापाठं तथा विद्या फलिष्यति॥१२॥३२७/४८
जशी बुद्धि असेल आणि जसा अभ्यास असेल त्या मानाने विद्येचें फल मिळणार. ७२७ यथा मधु समादत्ते रक्षन्पुष्पाणि षट्पदः।
तद्वदर्थान्मनुष्येभ्य आदद्यादविहिंसया ॥ ५/३४।१७ भुंगा जसा फुलांना अपाय न करता त्यांतील मध तेवढा काढून घेतो, त्याप्रमाणे राजाने लोकांचे मन न दुखवितां त्यांजपासून द्रव्य घ्यावे. ७२८ यथा मातरमाश्रित्य सर्वे जीवन्ति जन्तवः ।
. एवं गार्हस्थ्यमाश्रित्य वर्तन्त इतराश्रमाः ॥ १२।२६९।६ जसे सर्व प्राणी मातेचा आश्रय करून जिवंत राहतात, तसे गृहस्थाश्रमाच्या आधाराने इतर आश्रम राहतात. ७२९ यथा यथा हि पुरुषो नित्यं शास्त्रमवेक्षते ।
तथा तथा विजानाति विज्ञानमथ रोचते ॥ १२।१३०११० - मनुष्य जसजसा नेहमी शास्त्राचे अवलोकन करीत जाईल, तसतसे त्याला समजू लागेल, आणि नंतर त्याला ज्ञानाची आवड उत्पन्न होईल. ७३० यथा यथैव जीवेद्धि तत्कर्तव्यमहेलया ।
जीवितं मरणाच्छ्रेयो जीवन्धर्ममवाप्नुयात्॥१२॥१४१६५ ज्या ज्या प्रकारे जीविताचे संरक्षण होईल तें बेलाशक करावे. मरण्यापेक्षा जगणे हेच श्रेयस्कर आहे. कारण आधीं जगेल तर पुढे धर्म आचरण करील.
For Private And Personal Use Only